β : नाशिक :-⇔ गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस.बी. पंडित सरांना अखेरचा निरोप
β⇔ नाशिक गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस.बी. पंडित सरांना अखेरचा निरोप -( प्रतिनिधी : छाया लोखंडे ) :
गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस.बी. पंडित सरांना अखेरचा निरोप
नाशिक गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस.बी. पंडित सरांना अखेरचा निरोप -( प्रतिनिधी : छाया लोखंडे ) :
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 12 डिसेंबर 2023
β⇔ नाशिक : ता १२ ( प्रतिनिधी : छाया लोखंडे ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रिं. एस. बी. पंडित ह्यांचे दि . ११.१२.२०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, ते ९५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले , सुना, मुलगी , जावई व नातवंडे असा परिवार आहे.
पंडित सरांचा जन्म १९२८ साली शिरपुर, धुळे येथे झाला. सरांचे उच्च शिक्षण वर्धा येथे झाले. लंडन येथून त्यांनी अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी एफ. आर. इ.एस. प्राप्त केली. प्रिं. टी. ए. कुलकर्णी ह्यांच्या आग्रहावरून ते नाशिकला आले. प्राध्यापक, रेक्टर , प्रशासक. प्राचार्य अशा पदांवर त्यांनी समर्थपणे काम केले.
संस्थेच्या नाशिक रोड महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा त्यांनी समर्थपणे संभाळली. तसेच मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चे प्राचार्य पद त्यांनी भूषविले. वर्धा येथे त्यांचा महात्मा गांधी , आचार्य विनोबा भावे ह्यांच्याशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्याकडून देशभक्ती , सेवाभाव , शिस्तप्रियता असे संस्कार सरांवर झाले. सरांच्या जाण्याने संस्थेचा अनुभवी , पितृतुल्य आधार हरपला आहे.
नाशिकमधील अमरधाम येथे त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. संस्थेच्या सचिव प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांनी श्री पंडित सरांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ह्या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष व मुंबई विभागाच्या सचिव प्राचार्य डॉ. सुहासिनी संत , संस्थेचे विभागीय सचिव प्रा डाँ. राम कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त प्राचार्य आर. पी. देशपांडे , आस्थापना संचालक शैलेश गोसावी , प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे , कल्पेश गोसावी प्राचार्या डॉ. कविता पाटील, प्राचार्य डॉ . श्रीनिवास जोशी गोखले एज्युकेशन संस्थेच्या सर्व विभागातील प्राचार्य , प्राध्यापक , व शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी पंडित सरांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : मुख्य संपादक : भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०