नितेश कुमार यांना शरद पवार यांच्याकडून इंडिया आघाडीत येण्याची साद
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 5 जून 2024
β⇔नाशिक ,दि.5 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल नुकताच लागला असून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत महायुतीला जेरीस आणले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आपली ताकद पणाला लावत ३० जागावर आघाडी मिळवली आहे. तर महायुती १७ जागावर आघाडीवर आहे. यामध्ये ५४३ जागांसाठी एनडीए २८५ जागावर आणि इंडिया आघाडी २३५ जागावर पुढे आहे. यामध्ये दोन्ही आघाड्या बहुमताच्या जवळ असून काही जागा कमी पडल्याने खासदारांची जुळवा-जुळवा सुरू झाली आहे. दरम्यान बिहारमध्ये 15 – 17 जागावर आघाडीवर असलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांना शरद पवार यांनी फोन करत इंडिया आघाडीत येण्याची साद घातली आहे. दरम्यान नितेश कुमार इंडिया आघाडीमध्ये आल्यास त्यांना उपपंतप्रधानपद देऊन इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )