





मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : बोरगाव- प्रतिनिधी – लक्ष्मन बागुल
β⇒ बोरगाव , ता.२८ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा) : – सुरगाणा तालुक्यातील आदिवासी आसरा फाउंडेशनच्यावतीने मणिपूर येथे महिलांवर अत्याचार घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना आज निवेदन देण्यात आले. मणिपूर राज्यात 4 मे रोजी थौबाळ जिल्ह्यात आदिवासी जमातीच्या दोन महिलांवर अत्याचार झाला. या घटनेचा निषेध करण्यात येत असून त्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी. तसेच सदर घटना घडून 70 ते 80 दिवस झाले. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. आदिवासींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे . यावेळी सचिन राऊत, शांताराम गवळी, रमेश पवार, पंकज चव्हाण, किरण पवार, हेमंत चव्हाण, प्रदीप चौधरी, सौरभ पवार, हर्षल खांडवी, सुपियान शेख, राहुल भोये, रवींद्र गांगुर्डे, गणेश जोपळे, वसंत पवार, किरण गांगुर्डे उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले , मो .८२०८१८०५१०