एस.एम.आर.के.बी.के.महिला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 23 जानेवारी 2024
β⇔,नाशिक,दि.23(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी):-गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के.बी.के.महिला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व महाविद्यालयाचे वैशिष्ट्य असलेली ‘मिस एस. एम. आर. के.’ व्यक्तिमत्व स्पर्धा संस्थेच्या ‘गुरुदक्षिणा’ सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाली. ह्या कार्यक्रमाला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार डॉ. दीप्ती देशपांडे उपस्थिती होत्या .
महाविद्यालयात झालेल्या फिजिकल फिटनेस, पॅनल इंटरव्यू , सामान्य ज्ञानाची परीक्षा अशा विविध प्राथमिक फेरींमधून निवड झालेल्या अंतिम ११ विद्यार्थिनी आज अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. बी.एम.एस.ची विद्यार्थिनी मुक्ता जोशी मिस. एस. एम. आर. के. विजेती ठरली. तर १२ वी कला शाखेची विद्यार्थिनी नगमा अंसारी फर्स्ट रनर अप, व ट्रॅव्हल अँड टुरिझमची इशिता देवानी ही सेकंड रनर अप ठरल्या. स्पर्धेला परीक्षक म्हणून सुषुम्ना काणे, डॉ. प्रणीता गुजराती, डॉ. राधिका जाणोरकर , ह्यांनी काम पाहिले. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात लावणी नृत्य, हरियानवी नृत्य , गीत गायन, फॅशन शो ह्यांनी धमाल आणली. स्पर्धेचे परीक्षण संजय पुणतांबेकर व श्रीया गुणे पांडे ह्यांनी केले. संस्थेचे विभागीय सचिव डॉ राम कुलकर्णी ह्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ह्या स्पर्धचे प्रायोजकत्व नाशिक मधील प्रसिद्ध अवतार रेनटल्स व प्रभुज एथानिक वेअरचे संचालक प्रभज्योत सिंग, संजय बाफना , व अनुराधा आर्ट ज्वलरी हे होते .
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रो . कविता पाटील ह्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ह्या प्रसंगी उपप्राचार्या डॉ. सौ. नीलम बोकिल , डॉ. नितीन सोनगिरकर, डॉ .विवेक खरे समन्वयक आर्किटेक्ट संजय पाबारी , शोभा त्रिभुवन , मैथिली लाखे . विद्यार्थिनी सभा प्रमुख डॉ विवेक खरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते . कार्यकमाचे सूत्रसंचालन मृदांगी कुलकर्णी व सायली भामरे यांनी केले तर आभार काव्या रॉय हीने मानले . उद्या महाविद्यालयाच्या पाटणकर सभागृहात वार्षिक गुणगौरव समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ . कविता पाटिल यांनी दिली आहे .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो ८२०८१८०८१०