β⇔येडशी,(धाराशिव)ता.21(प्रतिनिधी: सुभान शेख ):-आज दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव आणि सर्वज्ञ प्रकाशन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव येथे एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाचे महत्त्व आणि रस्ता सुरक्षा नियमांबाबत जागरूक करणे होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षतेची जबाबदारी प्रा. डॉ. राहुल खोब्रागडे, विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव यांनी घेतली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री वसंत पाटील, संचालक सर्वज्ञ प्रकाशन संस्था पुणे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री उदयसिंह रामराव पाटील, प्राथमिक पदवीधर शिक्षक, जि.प. धाराशिव, श्री एम.जी. शेख, मोटार वाहन निरीक्षक आरटीओ कार्यालय, धाराशिव आणि सपोनी श्री सचिन बेंद्रे, शहर वाहतूक शाखा धाराशिव यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री निशिकांत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव यांनी वाहतूक नियमन आणि रस्ता सुरक्षा विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. मुख्य मार्गदर्शक श्री वसंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या शिस्तीचे पालन कसे करावे याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्याचबरोबर, त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सकारात्मक परिणामांचा उल्लेख केला. कार्यक्रमात एक मनोरंजक भाग म्हणून श्री उदयसिंह रामराव पाटील यांनी बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमानुसार प्रचार आणि प्रसार केला, ज्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली आणि कार्यक्रमाला विशेष आकर्षण मिळाले. त्यानंतर, सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा बाबत प्रतिज्ञा देण्यात आली. यामध्ये त्यांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे वचन दिले आणि रस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी कार्य करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथील पोलीस अधिकारी श्री निशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदार अमोल खराडे, बालाजी तोडकर, संतोष वाडकर, अमोल कलशेट्टी, प्रवीण खटके, दत्ता यादव, कुणाल दहीहंडी, प्रशांत म्हैत्रे, अमर माळी, किशोर हरभरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमनाची जागरूकता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
2 weeks ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
3 weeks ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )