β : नाशिक :⇔राज्यातील अनुदानित शाळा विनाअनुदानित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय,पालकांचे तीव्र आंदोलन-(प्रतिनिधी :सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔राज्यातील अनुदानित शाळा विनाअनुदानित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय,पालकांचे तीव्र आंदोलन-(प्रतिनिधी :सुरेश इंगळे)
राज्यातील अनुदानित शाळा विनाअनुदानित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय,पालकांचे तीव्र आंदोलन
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 8 जून 2024
β⇔नाशिक, दि.8 (प्रतिनिधी :सुरेश इंगळे ):- राज्यातील अनुदानित शाळा विनाअनुदानित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पालकांनी त्याचा विरोध करीत शिक्षण कार्यालयात आंदोलन केले. पालकांची भूमिका ही राज्य शासनाला कळविण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण उपसंचालकांनी दिले.
राज्य शासनाने अलीकडच्या काळामध्ये एक स्वतंत्र आदेश काढून ज्या शासनाच्या अनुदान घेणारा शाळा आहेत.त्या विनाअनुदानित म्हणजे कोणतेही अनुदान राज्य सरकारकडून त्या शाळांना मिळणार नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी शाळांची फी वाढणार आहे. त्यामुळे पालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
यावेळी संतप्त झालेल्या नाशिकमधील पालकांनी एकत्र येऊन नाशिक रोड येथील शिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन केले. काही काळ या ठिकाणी खूप मोठा गोंधळ निर्माण झाला होता .परंतु वेळेतच पोलिसांनी आपला बंदोबस्त ठेवीत आंदोलन आटोक्यात आणले. दरम्यान सुमारे दोन एक तासाच्या आंदोलनानंतर शिक्षण उपसंचालक हे कार्यालयात आले आणि त्यांनी या ठिकाणी पालकांना आपली भूमिका ही शासनाला कळविण्यात येईल, त्यानंतर शासन सांगेल त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)