दिंडोरी शिक्षक परिषदेचे प्रलंबित प्रश्नांबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन ! प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलनचा इशारा !
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि . 7, सप्टेंबर 2023
β⇒ दिंडोरी, ता . 7 ( प्रतिनिधी : खास ) :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे दिंडोरी तालुका संघटनेने गटविकास अधिकारी नम्रता जगताप व गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांची भेटून घेवून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढावे असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले . यावेळी निवेदन देताना शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष रावसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी दिंडोरी गटविकास अधिकारी नम्रता जगताप व गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी भेट घेतली आणि शिक्षकाच्या समस्या मांडल्या . त्यानंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये प्रलंबित शिक्षकांच्या वैयक्तिक व सामुहिक कामांसंदर्भात संबंधित लिपिक व कर्मचाऱ्यांना समक्ष नोंद करून कामे मार्गी लावण्या याव्यात अशा सूचना दिल्या.
सदर निवेदनामध्ये अशैक्षणिक कामे बंद करणे ,शिक्षकांचे सेवा पुस्तके अद्ययावत करणे, केंद्रानुसार सेवा पुस्तक शिबिर घेणे , प्रलंबित एकस्तर वेतन , नियमित वेतन फरक बिले व वर्षानुवर्ष प्रलंबित मेडिकल बीले निकाली काढण्यात यावी, तसेच गट- जि.प.स्तरावरुनहुन परत आलेल्या ३९ब मधील बिलांची त्रुटींची पुर्तता करणे,चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी ज्या शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले आहेत ते त्वरित मंजुरीसाठी कार्यवाही व्हावी आणि ज्या शिक्षकांची चटोपाध्याय मंजूर झालेले आहेत, त्यांना वेतनात लाभ मिळावा. त्याचबरोबर भाषा व समाजशास्त्र विषयाच्या पदवीधर शिक्षकांना लाभ मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी , असे सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, १५ दिवसांत योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . याप्रसंगी तालुकाध्यक्ष -रावसाहेब जाधव, कार्यवाह- रवींद्र ह्याळिज, जिल्हा कार्याध्यक्ष- शांताराम कापसे , कार्याध्यक्ष सुभाष बर्डे, कार्याध्यक्ष- राजेंद्र कापसे, कोषाध्यक्ष -नितीन शिंदे, तालुका सल्लागार- राहुल परदेशी, सरचिटणीस- सुधाकर नाठे, उपाध्यक्ष सुरेश भोये, कार्यकारी अध्यक्ष अशोक पवार, तालुका प्रतिनिधी- शाहुल वानखेडे, तालुका प्रतिनिधी- दादा इथापे, जिल्हा उपाध्यक्ष- बाळकृष्ण शिरसाठ, जिल्हा प्रतिनिधी- प्रभु वळवी, उपाध्यक्ष- विश्वास आहेर, उपाध्यक्ष मिलिंद धिवरे,पंकज गवळी, सहकार्यवाह शिवाजी भोसले आदी उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०