





सिद्धीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश!
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : बुधवार : दि 03 डिसेंबर 2024
सिद्धी इंटरनॅशनल अकॅडेमी, करंजाड येथील विद्यार्थ्यांनी जम्मू-काश्मीर येथे आयोजित राष्ट्रीय ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप 2024 आणि विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
राष्ट्रीय ग्रॅपलिंग चॅम्पियनशिपमध्ये कामगिरी:
- प्रियंका सचिन पाटील – सुवर्णपदक
- आराध्या भरत सूर्यवंशी – एक सुवर्ण व एक रौप्यपदक
- केतन दीपक मोरे – रौप्यपदक
- मोहित संजय सावंत – दोन रौप्यपदक
- दुर्गेश दीपक बच्छाव – कांस्यपदक
- अभिनव भरत भामरे – सहभाग
यामधील सहा विद्यार्थ्यांनी 2025-26 च्या आशियाई ग्रॅपलिंग निवडचाचणीसाठी पात्रता मिळवली आहे.
इतर क्रीडा स्पर्धांतील यश:
- दिशा शेवाळे – तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम
- श्रेयश त्र्यंबक खैरनार – जिल्हा कराटे स्पर्धेत द्वितीय
यापैकी दिशा शेवाळे आणि श्रेयश खैरनार हे विद्यार्थी कराटे अंतर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
मार्गदर्शकांचा विशेष योगदान:
या यशामागे विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रशिक्षक श्री. प्रशांत बच्छाव आणि सौ. राशी बच्छाव यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.
सत्कार आणि शुभेच्छा:
सिद्धी इंटरनॅशनल अकॅडेमीचे ट्रस्टी आणि व्यवस्थापन मंडळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि प्रशिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डावीकडून:
- कोच श्री. प्रशांत बच्छाव
- प्रियंका सचिन पाटील – सुवर्णपदक
- दिशा शेवाळे – तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम
- आराध्या भरत सूर्यवंशी – एक सुवर्ण व एक रजत पदक
- केतन दीपक मोरे – रजत पदक
- मोहित संजय सावंत – दोन रजत पदक
- अभिनव भरत भामरे – सहभाग
- दुर्गेश दीपक बच्छाव – कांस्यपदक
- श्रेयश त्र्यंबक खैरनार – जिल्हा कराटे द्वितीय
- कोच सौ. राशी बच्छाव
सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यशासाठी हार्दिक शुभेच्छा!
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )