β : नागपूर :⇔ महाराष्ट्र कलाल-कलार समाजाचा १२ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर धडक मोर्चा !!! (प्रतिनिधी : रमेश लांजेवार )
β : नागपूर :⇔ महाराष्ट्र कलाल-कलार समाजाचा १२ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर धडक मोर्चा !!! (प्रतिनिधी : रमेश लांजेवार )
महाराष्ट्र कलाल-कलार समाजाचा १२ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर धडक मोर्चा !!!
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भगवान सहस्रबाहु आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी !!!
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार :दि.9 डिसेंबर 2023
β⇔नागपूर , ता. 9 (प्रतिनिधी : रमेश लांजेवार ) :– काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने लिंगायत, वडार ,गुरव या समाजासाठी आर्थिक महामंडळे स्थापन करून त्यांना किमान ५० कोटी निधी देण्याची घोषणा केली. कलाल-कलार समाज केवळ विदर्भातच नव्हे ,तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील ५५ लाखापेक्षा जास्त संख्येने आहेत. विदर्भात या समाजाची लोकसंख्या १० लाखाहून अधिक आहे .परंतु आजपर्यंत या समाजाला कोणत्याही स्वरूपात विकास होण्यासाठी शासनाकडून कोणतेही महत्त्व दिले गेले नाही. वीरशैव लिंगायत, वडार, रामोशी, गुरव समाजासाठी जसे आर्थिक महामंडळ स्थापन केले गेले, त्याच धर्तीवर कलाल-कलार समाजाला सुद्धा भगवान सहस्रबाहु आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून मिळावे , या संदर्भात महाराष्ट्र कलाल कलार समाज संघटनेतर्फे नागपूर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली .
या वेळी संघटनेचे अध्यक्ष सागर समुद्रवार आणि जैन कलार समाजाचे नागपूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिवणकर, संघटनेचे प्रदेश प्रवक्ता रमेश लांजेवार यांनी कलाल-कलार समाजातील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडक मोर्चाचे आयोजन प्रमुख मागण्यांसह करण्यात आल्याचे सांगितले , त्यामध्ये १) राज्यात भगवान सहस्त्रबाहु अर्जुन यांच्या नावाने आर्थिक तरतुद असलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. २)विश्वकर्मा योजनेअंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या सर्व सवलती कलाल कलार समाजाला देण्यात याव्यात. ३)कलाल – कलार समाजातील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर वस्तीगृहासाठी राज्य शासनाने नाम मात्र किंमतीत समाजाला जागा उपलब्ध करुन द्यावी. या सर्व मागण्यांची पूर्तता होण्यासाठी कलाल-कलार समाजाला समाजाचा धडक मोर्चा मंगळवार दिनांक १२ डिसेंबर २०२३ ला नागपूर विधानभवनावर नेण्याचे आयोजन केले आहे. तरी या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने संपूर्ण समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आव्हान संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे .पर्यावरण मित्र चंद्रपाल चौकसे आणि अनिल अहिरकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जैन कलार समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर आदमने , शशिकांतजी समर्थ , फाल्गुन उके ,डॉक्टर प्रमोद मेहस्रे ,महेंद्र डोहरे ,नरेंद्र धुवारे ,दीपक वालोदे , प्रमोद मानकर, शेखर डहरवाल,खिलेंद्र बिठले, दिपक उके,सुरेश चौरीवार,राजू वारजूरकर,विश्वास गोसेवाडे, प्रशांत तिडके , मंगेश डांगे , सतीश दखने , रुपाली उके, संदीप तिडके , मंगेश खानोरकर , सुनील दहीकर, ॲड.सुर्यकांत जैस्वाल, संजय ठठेरे,आणि सर्व शाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संदर्भात प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित होते.
β⇔ ©नागपूर : रमेश लांजेवार (प्रदेश प्रवक्ता) मो.नं.९९२१६९०७७९,
β⇔ ©दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०