ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
β⇔नाशिक :⇔”भट्ट ब्राम्हणांची गुलामी नाकारणारा व स्वाभिमानी सम्राट महात्मा राजा रावणाची बदनामी थांबवा”- संपादकीय लेखक -श्री. बागुल..
β⇔नाशिक :⇔ "भट्ट ब्राम्हणांची गुलामी नाकारणारा व स्वाभिमानी सम्राट महात्मा राजा रावणाची बदनामी थांबवा"-संपादकीय लेखक -श्री. बागुल..
0
1
2
3
1
2
“भट्ट ब्राम्हणांची गुलामी नाकारणारा व स्वाभिमानी
सम्राट महात्मा राजा रावणाची बदनामी थांबवा“- संपादकीय लेखक –श्री. बागुल..
β⇔दिव्य भारत नि एस एम न्यूज : नाशिक : मंगळवार : दि. 24 ऑक्टोबर 2023
β⇔नाशिक, ता.24 :- (लेखक :-श्री. बागुल) :- रामायणात राम व रावण हे एकमेकांची प्रतिद्वंद्वी आहेत. रामायण हे कवी कल्पनेतून साकार झालेले काव्य होय. रामायण हे वाल्मिकीने लिहिलेले असे सांगण्यात येते . आज जे लोक डोक्यावर मलमूत्र वाहून नेतात , तो समाजवाल्मिकी समाज होय. हा समाज वाल्मिकीची जयंती दरवर्षी साजरी करतो. वाल्मिकी हा शूद्र होता आणि शूद्राला त्या काळात लिहीण्या वाचण्याचा अधिकार नव्हता. मग अनपढ, गवार, वाल्मिकी रामायण कसा लिहू शकतो ? आणि ते सुद्धा वैदिकांच्या संस्कृत भाषेत संस्कृत भाषा ही त्या काळात वैदिक आर्य ब्राह्मणाशिवाय कोणालाही येत नव्हती. रामायण हे वैदिक ब्राह्मणांच्या समूहाने लिहिले आहे. त्यांनी लिहिलेले रामायण बहुजन समाजावर लादायचे होते. ते वाल्मिकीच्या नावे बहुजन समाजावर लादले. बहुजनांनी ते आंधळेपणाने स्वीकारले रामायण हे वाल्मिकीने लिहिले असते तर ते लिहिताना शंबुक या शुद्रावर अन्याय केला नसता, उलट आपल्या बिरादरीचा म्हणून त्याला हिरो बनविले असते. एवढेच नव्हे तर अनार्य म्हणून रावणाला नायकत्व बहाल केले असते, रामाला खलनायक बनवले असते. पण रामायणात याच्या विपरीत घडले आहे. रामायण हे वैदिक ब्राह्मणांच्या चतुर गटाने (समूहाने) लिहिले व वाल्मिकीच्या नावाने खपविले. एवढा त्याग भट्टा ब्राह्मणांच्या पूर्वजांनी केला म्हणून आज त्यांच्या पिढ्या सर्वात सुखी आहेत. संपूर्ण समाजावर हिंदू धर्मावर व मंदिरावर त्यांचे नियंत्रण आहे.
आता थोडे रामायणाकडे वळू, दरवर्षी रावणाला जाळण्यात येते. असे त्यांनी कोणते वाईट कृत्य केले, की दरवर्षी त्याला ही शिक्षा मिळावी. याचा बहुजन समाजाने अभ्यास केला आहे का? हा बहुजन समाज कोणाच्या तरी सांगण्यावरून रावणाला जाळतो व त्याचा तिरस्कार करतो. रावणाने सीतेला पळवून नेले, परंतु तिला पळवून नेण्याइतकी परिस्थिती का निर्माण झाली? याचा विचार कधी बहुजन समाजाने केला आहे काय? स्वतःला सरस्वतीचे पुत्र म्हणवून घेणारे भट्ट ब्राम्हण सांगतात, रावण क्रूर होता, राम सत्यवचनी होता, रावण दहा तोंडाचा होता, सीतेला रावणाने पळवून नेले व तिचा छेळ केला. आम्ही बहुजन फक्त माना हलवितो. पण खरेच रावण क्रूर होता काय? त्याला दहातोंडे असतील का? राम केवळ एका बाणाने रावणाच्या हजारो सैनिकांना मारू शकेल काय? असे प्रति प्रश्न आम्ही करीतच नाही. हे बहुजन समाजाचे मोठे दुर्दैव होय. त्यामुळेच तो आज ब्रम्हणवाद्यांचा गुलाम व त्यांच्या हातचे प्यादी बनलेला आहे. रावणाने सीतेला पळवून नेले. सीता बरेच दिवस त्याच्या ताब्यात होती. रावणाने सीतेचा जबरदस्तीने उपयोग घेतला असता, परंतु रावणाने तसे केले नाही. उलट सीतेच्या सोईसाठी दासी ठेवल्या. यावरून रावण हा भोगविलासी व स्त्री लंपट नव्हता. कसे सीतेचे अपहरण हे राम व लक्ष्मण कडून रावणाची बहीण शूर्पणखेवर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी केला, हे स्पष्ट होते. उलट राम हा भोगविलासी व क्रूर होता . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राम व कृष्णाचे कोडे या ग्रंथात सिद्ध केले आहे. शुर्पनखेनी केवळ रामा जवळ लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. परंतु रामाने तिचे नाक कान व स्तन कापून आपला क्रूरपणा सिद्ध केला. आपल्या बहिणीची एवढी क्रूरचेष्टा होऊन सुद्धा रावणाने आपल्या बहिणीचा बदला क्रूरपणे घेतला नाही. एव्हाना सीतेचे सुद्धा नाक, कान व स्तन कापले असते. पण रावणाने सीतेचे केवळ अपहरण करून तिला राजमहालात ठेवले.
बहुजन हो ! आपल्या बहिणीची कोणी अशी क्रूचेष्टा केली व छेडछाड केली , तर आपण बदला घेताना ? जशास तसे वागता ना ? मग आता तुम्हीच ठरवा श्रेष्ठ राम की रावण? असे असूनही भट ब्राह्मणांनी रावणाला भयानक अन्याय व क्रूर असे ठरवून त्याची बदनामी करून राक्षस ठरविले. तर स्त्रियांचा सन्मान कसा केला पाहिजे. हेही ज्या रामाला माहीत नाही त्याला देव बनविले. बहुजन हो रावण हा स्वाभिमानी बहुजन राजा होता. भट्ट ब्राम्हणांचे वर्चस्व त्याने नाकारले होते. तर राम हा भट्ट ब्राह्मणांचा गुलाम होता. स्वाभिमान शून्य होता . म्हणून भट्ट ब्राह्मणांनी रामाचा उदो उदो केला, व रावणाला शिव्या दिल्या. आपण आपल्या बहुजन राजाला जळतो. तेही दुसऱ्याने सांगितले व लिहून ठेवले म्हणून … *पण आता आपण आपल्या डोक्यांनीच विचार केला पाहिजे, चिंतन केले पाहिजे. खऱ्या खोट्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. आपल्या धड्यावर आपले डोके ठेवले पाहिजे, आपली खरी भारतीय अनार्य संस्कृती काय आहे. हे जाणून घेतले पाहिजे.
“अवैदिक क्रांतीप्रतिक महामानवांचा विजय असो !!”
पुनःश्च! सत्य की जय होsss👍
β⇔ लेखक :-श्री. बागुल…🖊️
चक्रधर शिव ,फुले, शाहू , आंबेडकर विचारमंच अँड
🖊️ महात्मा रावण सेना समूह 🖊️
0
1
2
3
1
2