बिटको महाविद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 26 जानेवारी 2024
β⇔नाशिकरोड, दि.26 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ७५ वा ‘ भारतीय प्रजासत्ताक दिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसी व एअरविंगच्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून ध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर जयरामभाई हायस्कूल व जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व सांस्कृतिक सामूहिक नृत्य, लेझीम कवायती सादर केले. एनसीसी व एयरविंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सना ‘ स्व. श्रीकांत वैद्य ट्रॉफी ‘ यावर्षी कॅडेट वेदांत गायकवाड, रुचिता मिश्रा यांना प्रदान करण्यात आली.याप्रसंगी प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ. के. सी. टकले, कला शाखा उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, लेफ्टनंट डॉ. विजय सुकटे, देवेंद्र हातखंबकर,सर डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या श्रद्धा देशपांडे, क्रीडाशिक्षक महेश थेटे, जयराम हायस्कूलचे मुख्याध्यापक शालिनी खरे , जे.एन.अहिरे,जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमलता तांबोळी, दिलीप उदमाले, राजेंद्र साळुंके यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. त्यानंतर पीएचडी व पुरस्कार प्राप्त मिळालेल्या प्राध्यापकांचा सत्कार समारंभ पार पडला.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो 8208180510