





येडशी ग्रामपंचायत सुस्त , महिला , शाळकरी विद्यार्थी त्रस्त !
धाराशिव पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष,प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 5 फेब्रुवारी 2024
β⇔येडशी(धाराशिव), दि.5( प्रतिनिधी : सुभान शेख ):- उस्मानाबाद – धाराशिव तालुक्यातील येडशी येथील सुभाषनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ५ मधील शिवाजी नाईकवाडी यांच्या घरासमोरील मुख्य प्रभात फेरीचा रस्ता मागील अनेक दिवसांपासून या रस्त्यावर बोअरचे पाणी , पहाटेच्या सुमारास महिलांनी आपापल्या घरासमोरील पाण्याचा सडा टाकलेले पाणी, इमारत बांधकामाचे पाणी या रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सदर रस्त्यावर साचलेले पाणी काही दिवसांनी दुषित पाणी होऊन , दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीमुळे मच्छर , मोठमोठे डास होत आहे. या डासांमुळे रस्त्यावरील ये – जा करणारे महिला , नागरिक यांना आरोग्य बिघडत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावर दररोज सकाळी चार चाकी , दोन चाकी , तीन चाकी वाहने ये-जा करत असतात त्याचबरोबर गावातील वृद्ध महिला , पुरुष आणि शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थीनी सकाळी व संध्याकाळी दररोज ये -जा करतात. गावातील महिलांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२९ जानेवारी २०२४ सोमवार रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महिला – शायदा मिटु शेख (वय – ४८) राहणार – बलवंड गल्ली , व्यवसाय – मजुरी ही सदर महिला या रस्त्यावरुन मुख्य ग्रामपंचायतच्या दिशेने घराकडे जात असताना पाण्यात पाय घसरून पडली. त्यामुळे जखमी झाली असून २९ जानेवारीपासुन घरात बसून आहे. महिलेच्या गुडघ्याला पुर्णपणे सुज आली आहे.

येडशी “दिव्य भारत” प्रतिनिधी सुभान शेख यांनी ग्रामपंचायतीला वारंवार सांगून देखील ग्रामपंचायत प्रश्नाकडे कानाडोळा करीत आहेत . जर जबाबदार लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असतील तर रस्त्यावर सांडपाणी थांबविणार कोण ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित्त केला आहे. या रस्त्यावर पंधरा दिवसापूर्वी हमीदा साहेबलाल शेख (वय-६५) (रा. बलवंड गल्ली) ह्या देखील रस्त्यावर साचलेले पाण्यात पडली होत्या. अशा वारंवार घटना घडत असल्याने नागरिक चिंतेत आहेत. परंतु ग्रामपंचायत या [राष्नाकडे दुर्लक्ष करत आहे . वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी , महिला , वृद्ध नागरिकांनी केली आहे.
येडशी ग्रामपंचायत – ग्रामविकास अधिकारी , सरपंच , उपसरपंच , सदस्य या रस्त्याकडे मागील अनेक दिवसांपासून खाली मान घालून ये – जा करतात. परंतु रस्त्याच्या प्रश्नाकडे कोणीही दखल घेत नाही. शायदा मिटु शेख ही महिला रस्त्यावरुन पाय घसरून पडल्याने या घटनेला जबाबदार ग्रामपंचायत की गावातील लोकप्रतिनिधी किंवा धाराशिव पंचायत समिती गटविकास अधिकारी कुणाकडे बोट दाखवायचे ? असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी देखील ये- जा करत असतात. मग ग्रामपंचायत कोणती कामे करणार आहे. ग्रामपंचायतीला दिड वर्ष झाले, तरी या रस्त्याकडे कानाडोळा करुन दुर्लक्ष करीत आहे.अशी माहिती महिलांनी देतांना नाराजी व्यक्त केली आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व धाराशिव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी स्वतः येऊन पाहणी करावी व रस्त्याचे सिंमेंट कॉक्रेटीकरण करण्यात यावे. गावातील वृद्ध नागरिक व विद्यार्थी – विद्यार्थीनी यांची समस्या प्रलंबित प्रश्न लवकर सोडवण्यात यावेत , अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510