β : बोरगाव :⇔देवळा येथे वेल्स ऑन व्हिल्स तर्फे ५९ कुटुंबांना मोफत ड्रमचे वाटप,सामाजिक बांधिलकीचे दर्शन-( प्रतिनिधी : लक्षण बागुल )
β : बोरगाव :⇔देवळा येथे वेल्स ऑन व्हिल्स तर्फे ५९ कुटुंबांना मोफत ड्रमचे वाटप,सामाजिक बांधिलकीचे दर्शन-( प्रतिनिधी : लक्षण बागुल )
देवळा येथे वेल्स ऑन व्हिल्स तर्फे ५९ कुटुंबांना मोफत ड्रमचे वाटप , सामाजिक बांधिलकीचे दर्शन
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 2 जानेवारी 2024
β⇔बोरगाव, ता. 2 ( प्रतिनिधी : लक्षण बागुल ) :– सामाजिक बांधिलकीतून सुरगाणा तालुक्यातील अती दुर्गम असलेल्या देवळा येथील आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार कमी करण्यासाठी वेल्स ऑन व्हील या संस्थेतर्फे ५९ पाण्याच्या फिरत्या ड्रमचे वाटप करण्यात आले. आदिवासी महिलांना उन्हाळ्यात दूरवरून डोक्यावर हंडे घेऊन पाण्याचा शोध घेवून पाणी डोक्यावर आणावे लागते . महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार हलका व्हावा यासाठी वेल्स ऑन व्हिल्स संस्थेच्या वतीने मेनमाळ येथील ५९ कुटुंबांना ड्रम वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रकल्प संचालक शहा मेनन, संचालक अजय देवरे, प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले, स्वप्नील पाटील, पवन वायदंडे, संकेत बिडगर, रोशन भांगरे, विजय देवरे यांच्या उपस्थितीत पार पडले. ड्रम वाटप प्रसंगी सुनील जाधव, राजू धूळे, सुरेश माळघरे, अनिता चौधरी, कमळा धूम, जल परिषद मित्र परिवार, ग्रामस्थ उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो .८२0८१८0५१0