





शिक्षण हा राष्ट्राच्या विकासाचा कणा – डॉ.एस.आर.यादव

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि.19 फेब्रुवारी 2025
β⇔नाशिक,दि.19 (प्रतिनिधी: छाया लोखंडे ):-शिक्षण हा राष्ट्राच्या विकासाचा कणा आहे.शिक्षकांची राष्ट्रविकासातील भूमिका महत्त्वपूर्ण आहे.असे प्रतिपादन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वनस्पती संशोधक डॉ.एस.आर. यादव यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या १०७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित दिमाखदार स्थापनादिन सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. आपल्या भाषणात गोखले एज्युकेशन सोसायटीबद्दल आदर व्यक्त करताना त्यांनी संस्थेतील गुरू – शिष्य परंपरा ,ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी घेतलेले परिश्रम यांचा विशेष उल्लेख केला.
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीचा १०७ वा वर्धापनदिन सोहळा संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहात साजरा झाला. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्रख्यात संशोधक डॉ.एस आर.यादव कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव,खजिनदार आणि मानव संसाधन संचालिका डॉ.दीप्ती देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक संतोष मंडलेचा,गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.आर.पी.देशपांडे तसेच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन डॉ.सुहासिनी संत उपस्थित होत्या.
व्यासपीठावर संस्थेचे नाशिक विभागाचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी,प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे,आस्थापना संचालक शैलेश गोसावी ,डॉ.अंजली कुलकर्णी,प्राचार्य डॉ. व्ही.एन. सूर्यवंशी,प्रसिद्ध संशोधिका डॉ.उषा यादव,अक्षय देशपांडे उपस्थित होते. डॉ.सुहासिनी संत यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रोफेसर डॉ.एस.आर.यादव यांना सर डॉ.एम.एस.गोसावी एक्सलंस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांनी पुरस्कार म्हणून मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम जव्हार कॉलेजच्या बोटानिकल गार्डन प्रकल्पासाठी देणगी म्हणून संस्थेला परत दिली.
संस्थेचे देणगीदार जयंतराव कुलकर्णी,गौतम क्षत्रिय, माजी प्राचार्य प्रा.डी.के.गोसावी, प्रा.हर्षवर्धन कडेपूरकर, डॉ.के.आर.शिंपी,तसेच उपस्थित सेवानिवृत्त प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते जी ई एस प्रोफाईल,स्वयंप्रकाश,स्वयंप्रेरणा,ज्ञानपर्व , स्पेक्त्रम ,रेझोनांस या नियतकालिकांचे विमोचन करण्यात आले. श्री.संतोष मंडलेचा यांनी आपल्या भाषणात गोखले एज्युकेशन सोसायटीचा गौरव करताना सत्य आणि नैतिकता हा या संस्थेचा पाया आहे असे सांगितले. आपण या संस्थेचे माजी विद्यार्थी आहोत याचा अभिमान वाटतो असे ते म्हणाले.अध्यक्षीय मनोगतात डॉ.दीप्ती देशपांडे यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रगतीचा आढावा घेतानाच देणगीदार,निवृत्त प्राचार्य,प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निस्पृह योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले. टीचर अचिव्हर अवॉर्ड २०२५ डॉ.दीप्ती देशपांडे यांना देण्यात आले. बेस्ट टीचर अवॉर्ड एच पी टी कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.एन.सूर्यवंशी, एस एम आर के कॉलेजचे आर्किटेक्ट संजय पाबारी,नीलेश अलोणे ,डॉ.स्नेहा रत्नपारखी,मुख्याध्यापक एस.ए.मुरकर,बोर्डी येथील वसंत शनवार, बोरिवली येथील जितेंद्र तेले यांना देण्यात आले. बेस्ट एम्प्लॉइ अवॉर्ड गंधाली गोसावी ,रमेश कोरडा यांना देण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र कोसबाड या केंद्राला तसेच भिकुस्सा हायस्कूल ,सिन्नर यांना बेस्ट इन्स्टिट्युट अवॉर्ड देण्यात आले.बेस्ट मॅगझिन अवॉर्ड एन बी मेहता कॉलेज, बोर्डीच्या Ameranth ला देण्यात आले.Teacher Entrepreneur Award डॉ.संजय औटी यांना देण्यात आले. यावेळी पी एच डी पदवी प्राप्त केलेल्या प्राध्यापकांचाही सत्कार करण्यात आला. डॉ.राम कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ.प्रणव रत्नपारखी यांनी मानपत्राचे वाचन केले.ज्ञानेश्वर कासार यांनी ईश स्तवन सादर केले. डॉ.स्नेहा रत्नपारखी आणि डॉ.मुग्धा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. ह्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य , प्राध्यापक , विद्यार्थी शिक्षक , व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )