





“धाराशिवमध्ये सणासुदीच्या आनंद शिध्याचे वाटप रखडले: शिधापत्रिका धारकांची नाराजी“

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 15 ऑगस्ट 2024
β⇔येडशी(धाराशिव), दि.15 (प्रतिनिधी : सुभान शेख ):- राज्य सरकारने सणासुदीच्या निमित्ताने जाहीर केलेल्या 100 रुपयात “आनंदाचा शिधा” योजने अंतर्गत धाराशिव तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने शिधापत्रिका धारकांना रवा, साखर, चणाडाळ आणि तेल यासारख्या चार वस्तूंचे प्रत्येकी एक-एक किलोचे वाटप करणार होते. मात्र, सणासुदीचे महत्त्वाचे सण गणेश चतुर्थी (दि. ७ सप्टेंबर) आणि गौरी आवाहन (दि. १० सप्टेंबर) होऊनही अद्याप “आनंदाचा शिधा” उपलब्ध झालेला नाही.
येडशी गावातील ग्रामस्थांनी मिळालेल्या माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानदारांनी केवळ रेशनच उपलब्ध करून दिले आहे, परंतु आनंदाचा शिधा अद्याप पोहोचलेला नाही. दुकानदारांनी ग्रामस्थांना सांगितले की, शिधा आल्यानंतरच त्याचे वाटप होईल. त्यामुळे अनेक शिधापत्रिका धारकांनी रेशन उचलणे टाळले आहे. ते सांगतात की, आनंदाचा शिधा आल्यानंतरच ते रेशनसह शिधा घेऊन जातील.
यूट्यूब चॅनल ‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’चे येडशी प्रतिनिधी सुभान शेख यांनी धाराशिव पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, सध्या केवळ तेलाच्या पिशव्या आल्या आहेत, आणि उर्वरित वस्तू लवकरच येण्याची अपेक्षा आहे. ग्रामस्थ आणि शिधापत्रिका धारकांनी सरकारकडे मागणी केली आहे की, लवकरात लवकर सर्व वस्तूंची उपलब्धता करून आनंदाचा शिधा वितरण सुनिश्चित करावा. त्यासाठी राज्य शासनाने तत्काळ पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )