





श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर महाविद्यालयात “जागतिक फार्मासिस्ट दिन” मोठ्या उत्साहात साजरा !
β : नाशिक :⇒ श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा – ( प्रतिनिधी : अमोल चव्हाण )
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. २५ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिक, ता . २५ ( प्रतिनिधी : अमोल चव्हाण ) येथील श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त महाविद्यालयात अवयव दान याविषयावर प्रदर्शन मांडण्यात आली. प्रदर्शन प्रमुख पाहुणे म्हणून इंदिरा गांधी हॉस्पिटलचे प्रभारी डॉ. विजय देवकर लाभले. प्रमुख पाहुणे डॉ. विजय देवकर यांनी अवयवदान बद्दल विद्यार्थ्यांसोबत सवांद साधून त्यांना मार्गदर्शन दिले. संस्थेचे व्यवस्थापकीय मान्यवरांनी प्रदर्शनिला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे कौतुक केले.


सदर प्रदर्शनाला संस्थेचे विश्वस्त चंद्रकांत बटाविया, विश्वस्त मोहनभाई पटेल, कार्यालय सचिव देवेंद्र पटेल, फार्मसी महाविद्यालयाचे सचिव राजेशभाई ठक्कर, सहसचिव अभयभाई चोकसी, विक्रमभाई कपाडिया, हसमुखभाई पोक्कर आदि मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनात विविध मानवीय अवयव, त्यांची ओळख , त्यांचे कार्य आणि महत्व समजावण्यासाठी फार्मासी महाविद्यलयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे मानवीय अवयवांचे मॉडेल, ३ डी रांगोळी तसेच पोस्टर प्रेजेंटेशन द्वारे जनजाग्रृती केली. या प्रदर्शनीला लहान गटापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी भेट देऊन अवयव दानाचे महत्व आणि अवयव दानासाठी फार्मासिस्टची भूमिका समजावून घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून फार्मासिस्ट दिनाचा इतिहास नमुद केला. कार्यक्रमाचे समन्वयक पदी डॉ. मनीषा तायडे आणि डॉ. अमर झाल्टे होते.
प्रदर्शनाच्या नियोजनात सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचे योगदान मिळाले. प्रदर्शनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाई ठक्कर, उपाध्यक्ष प्रकाशभाई पटेल, फार्मसी महाविद्यालयाचे अध्यक्ष अनिलभाई बदियानी, ,संयुक्त सचिव .उपेंद्रभाई दीनानी आणि संस्थेचे इतर सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास सर्व विद्यार्थीवर्ग,प्राध्यापकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भाग्वात महाले : मो. ८२०८१८०५१०
