Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

         शिक्षणतज्ज्ञ  सर डॉ. मो. स. गोसावी यांचे नाशिक येथे  निधन 

         शिक्षणतज्ज्ञ  सर डॉ. मो. स. गोसावी यांचे नाशिक येथे  निधन 

0 0 2 8 6 9

         शिक्षणतज्ज्ञ  सर डॉ. मो. स. गोसावी यांचे नाशिक येथे  निधन 

 

दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक प्रतिनिधी : प्रा . छाया लोखंडे -गिरी 

          नाशिक ता .९ (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा)  :-   शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक आदरणीय सर डॉ. मो. स. गोसावी ह्यांचे ९. ७. २३ रोजी पहाटे १.४५ मिनिटांनी वयाच्या ८८ व्या वर्षी देहावसान झाले. शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना मास्टर टीचर मिलेनियम , भारतरत्न लता मंगेशकर हयांच्या हस्ते विद्या सरस्वती अॅवॉर्ड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र भूषण अॅवार्ड , ज्ञानहीरा , राजीव गांधी फांऊडेशन चा शांतता पुरस्कार , मॅन ऑफ द इयर , नाशिक भूषण व फलटण भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

आपल्या शैक्षणिक कारकीर्दीची सुरवात त्यांनी बी .वाय के महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी घेऊन झाली. व पहिल्याच दिवशी कवी कुसुमाग्रजांचा ‘ प्राचार्यांचे प्राचार्य व्हा’ . असा आशीर्वाद त्यांना मिळाला. हे आशीर्वाद सरांनी आपल्या कार्यातून सार्थ केले .                      प्रभावी अध्यापना बरोबरच त्यांनी अविरत मनन, संशोधन चिंतन ह्यातून जवळपास ५० हून अधिक ग्रंथ संपदा निर्माण केली व १०० हून अधिक पुस्तकांचे संपादन केले. व्यवस्थापन विषयात अमूल्य संशोधन करून पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन ह्या विषयातील पदवी सर्व प्रथम प्राप्त करणण्याचा बहुमान त्यांना मिळाला. वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षणा बरोबरच सरांनी संस्कृत , मराठी , हिंदी व जर्मन ह्या भाषांचे ही सखोल अध्ययन केले. व साहित्याचार्य , साहित्य प्राज्ञ, साहित्य विषारद ह्या पदव्या ही विशेष प्राविण्या सहित प्राप्त केल्या. सर्वात तरुण प्राचार्य व ३७ वर्षाचा सर्वाधिक कालखंड पूर्ण करणारे प्राचार्य म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील सार्थ योगदानाला ६५ वर्षे पूर्ण झाली होती. संस्थेच्या सचिव पदाची व नंतर महासंचालक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. व खऱ्या अर्थाने गोखले एज्युकेशन सोसायटीचा विकास व विस्तार झाला.
.शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण व दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी गोखले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. व त्यांच्या साठी शिक्षणाची कवाडे खुली केली होती. सामाजिक विकासासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे, हा विश्वास ठेवून त्यांनी स्वतःला शिक्षणाच्या प्रचार – प्रसारासाठी आजीवन वाहून घेतले होते. सरांच्या प्राचार्य पदाचा प्रारंभ ज्या बी. वाय. के महाविद्यालयातून झाला तिथे त्यांचे पार्थिव शरीर सकाळी १० ते ५ ह्या वेळेपर्यंत अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शना साठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरद पवार , कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे . राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर नेते ,आमदार छगन भुजबळ, दिनकर पाटील , समीर भुजबळ , वसंत गिते सुनील बागुल आले होते. त्यांच्या अनेक प्रथितयश विद्यार्थ्यांपैकी श्री प्रशांत खंबासवाडकर , प्रशांत अमीन तसेच नाशिक शहरातील अनेक मान्यवरांनी व संस्थेचे देणगीदार क्षत्रिय परिवार कपाडिया परिवाराचे सदस्य ह्या वेळी आले होते. संध्याकाळी ५.३० वाजता त्यांच्यावर अंत्य संस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू विजय गोसावी दोन पुत्र शैलेश गोसावी व कल्पेश गोसावी कन्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे जावई प्राचार्य प्रदीप देशपांडे , दोन स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. शिक्षण क्षेत्रात स्वयं प्रकाशित, तेजस्वी ताऱ्या प्रमाणे आलोकित राहून समाजासाठी प्रकाश वाटा तयार करणाऱ्या ह्या ज्ञान सूर्याला विनम्र अभिवादन.

दिव्य भारत बी एस एम न्यूज :  मुख्य संपादक : डॉ भागवत महाले ,मो . ९१८२०८१८०५१० 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 6 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!