Breaking
ब्रेकिंग

β⇔सुरगाणा (शहर) :⇔ “शासकीय वसतिगृहातील जेवण निकृष्ट दर्जाचे, विद्यार्थीनींचा मोर्चा कळवणच्या दिशेने,मोर्चा माघारी फिरविण्यास प्रांत प्रांताधिकारी यांना यश”-( प्रतिनिधी : रतन चौधरी)

β⇔सुरगाणा (शहर) :⇔ "शासकीय वसतिगृहातील जेवण निकृष्ट दर्जाचे, विद्यार्थीनींचा मोर्चा कळवणच्या दिशेने,मोर्चा माघारी फिरविण्यास प्रांत प्रांताधिकारी यांना यश"-( प्रतिनिधी : रतन चौधरी)

018491

“शासकीय वसतिगृहातील जेवण निकृष्ट दर्जाचे, विद्यार्थीनींचा मोर्चा कळवणच्या दिशेने,मोर्चा माघारी फिरविण्यास प्रांत प्रांताधिकारी यांना यश”

β⇔सुरगाणा (शहर) :⇔ "शासकीय वसतिगृहातील जेवण निकृष्ट दर्जाचे, विद्यार्थीनींचा मोर्चा कळवणच्या दिशेने,मोर्चा माघारी फिरविण्यास प्रांत प्रांताधिकारी यांना यश"-( प्रतिनिधी : रतन चौधरी)
β⇔सुरगाणा (शहर) :⇔ “शासकीय वसतिगृहातील जेवण निकृष्ट दर्जाचे, विद्यार्थीनींचा मोर्चा कळवणच्या दिशेने,मोर्चा माघारी फिरविण्यास प्रांत प्रांताधिकारी यांना यश”-( प्रतिनिधी : रतन चौधरी)

प्रांत अधिकारी पुलकित सिंह  यांची  एक ते दीड किलोमीटर पायपीट

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि.22 मार्च 2024 

β⇔सुरगाणा (शहर)दि. 22 ( प्रतिनिधी : तन चौधरी): – नवीन शासकीय मुलींचे वसतिगृह सुरगाणा येथील पंचवीस ते तीस मुली वसतिगृहातील असुविधा  नवीन वसतिगृहाकरीता अधिक्षिकेची तात्काळ नेमणूक करावी. यासह विविध मागण्यांकरीता सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सुरगाणा येथून रणरणत्या भर उन्हात पायपीट करीत मुलींचा मोर्चा हातात मागण्यांचे फलक घेत कळवणच्या प्रांत कार्यालयाकडे निघाला होता.
                   बुबळी जवळील उमरेमाळ येथे पोहचला होता.त्याचवेळी तहसिलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दखल घेत उमरेमाळ येथे जाऊन मुलींचे विविध मागण्यांचे निवेदन स्विकारले , यामध्ये पिण्याचे पाणी व अंघोळीसाठी पाणी मिळत नाही, प्रभारी स्री अधिक्षिका यांची तात्काळ बदली करण्यात यावी, जेवण निकृष्ट दर्जाचे व अळ्या असलेले पुरविण्यात येते. त्यामध्ये सुधारणा घडवून आणावी, डीबीटी बंद करण्याची धमकी अधिक्षिका यांच्या कडून देण्यात येते, सुट्टी कधीही मिळत नाही, वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्यात येईल, आजारपणात दुर्लक्ष केले जाते.वेळेवर औषध गोळ्या दिल्या जात नाहीत, सोलर यंत्रणा बंद असल्याने गरम पाणी मिळत नाही, मुलींना झोपण्यासाठी बेड पुरवले जात नाहीत, स्वखर्चाने झाडू आणावे लागतात, पोटभर जेवण दिले जात नाही यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

                 तहसिलदार यांनी मुलींशी संवाद साधत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले मात्र यावर मुलींचे समाधन न झाल्याने अखेर तहसिलदार राठोड यांनी प्रांत अधिकारी पुलकित सिंह यांना घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांनीची भेट घेऊन समस्या समजावून घ्याव्यात अशी विनंती केल्याने सिंह यांनी उमरेमाळ येथे येत विद्यार्थींनीशी संवाद साधत मागण्यां समजून घेतल्या. याचवेळी एका मुलीला उन्हाचा त्रास झाल्याने उलट्या झाल्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.उमरेमाळ येथून मुलींना प्रांत अधिकारी यांच्या गाडीत बसवून तहसिल कार्यालयात आणण्यात आले.यावेळी प्रांत अधिकारी यांना दुसरे वाहन उपलब्ध न झाल्याने रखरखत्या उन्हात एक ते दीड किलोमीटर पायपीट केली. विद्यार्थीनींशी संवाद साधत समस्या समजून घेत दोन, चार दिवसांत समस्या सोडविण्याचे मान्य केल्याने मोर्चा माघारी फिरविण्यास सिंह यांना यश आले. पोलीस निरीक्षक यांनी मुलींच्या संरक्षणासाठी होमगार्ड, पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंगल देवरे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार, सुरेश गवळी,सावळाराम पवार,रतन चौधरी,विजय पवार आदी घटनास्थळी उपस्थित होते.

 विविध मागण्यांकरीता शासकीय वसतिगृहातील मुलींचा कळवण येथे निघालेला मोर्चा.  मुलींच्या समस्या समजावून घेतांना कळवणचे प्रांत अधिकारी पुलकित सिंह. मुलींची समजूत काढतांना प्रांत अधिकारी पुलकित सिंह

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!