Breaking
ब्रेकिंग

β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ शिक्षक परिषद नाशिक संघटनेच्या निवडश्रेणी आंदोलनास अभुतपुर्व यश, लवकरच मिळणार लाभ , सर्वत्र कौतुक –  ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ शिक्षक परिषद नाशिक संघटनेच्या निवडश्रेणी आंदोलनास अभुतपुर्व यश, लवकरच मिळणार लाभ , सर्वत्र कौतुक -  ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

0 0 2 3 9 6

शिक्षक परिषद नाशिक संघटनेच्या निवडश्रेणी आंदोलनास,  अभुतपुर्व यश लवकरच मिळणार लाभ !

β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ शिक्षक परिषद नाशिक संघटनेच्या निवडश्रेणी आंदोलनास अभुतपुर्व यश, लवकरच मिळणार लाभ , सर्वत्र कौतुक -  ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ शिक्षक परिषद नाशिक संघटनेच्या निवडश्रेणी आंदोलनास अभुतपुर्व यश, लवकरच मिळणार लाभ , सर्वत्र कौतुक –  ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि.30 डिसेंबर 2023 

β⇔दिंडोरी ( नाशिक) , त 30  ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):-  प्रतिनिधी: नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक पंचवीस वर्षांपासून निवडश्रेणी पासुन वंचित आहेत , ही बाब गंभीर असुन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक तर्फे एक वर्षापासून निवडश्रेणी संदर्भात लढा सुरू केलेला आहे . त्यामध्ये धरणे आंदोलने ,आमरण उपोषण , मनुष्यबळ देऊन योग्य ती मदत करुन नाशिक जिल्हा भरातील एकुण २४३० प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामध्ये प्राथमिक शिक्षक २३४९, पदवीधर शिक्षक ७५, मुख्याध्यापक ६, केंद्रप्रमुख ००प्रस्ताव दाखल केले होते. प्रत्येक वर्षी २०% पात्र शिक्षक असे १९९५ ते २०२३ दरवर्षीचे निश्चित करुन निवड श्रेणी दिली जाणार आहे.
               नाशिक जिल्ह्यात अशक्यप्राय वाटणारी निवड श्रेणी प्रस्ताव शिक्षक वारंवार देऊन वैतागले होते. परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संस्थापक कोषाध्यक्ष संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणी लागु करणेसंदर्भात वर्षभरापासून लढा न्यायालयीन,धरणे आंदोलन,आमरण उपोषण,प्रशासनास सहकार्य करुन सदर वेतनश्रेणी मंजुरीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले.त्याचेच फलित लवकरच जिल्हा भरात निवड श्रेणी मंजुर होणार आहे अशी माहिती संजय पगार यांनी दिली.

 β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ शिक्षक परिषद नाशिक संघटनेच्या निवडश्रेणी आंदोलनास अभुतपुर्व यश, लवकरच मिळणार लाभ , सर्वत्र कौतुक -  ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ शिक्षक परिषद नाशिक संघटनेच्या निवडश्रेणी आंदोलनास अभुतपुर्व यश, लवकरच मिळणार लाभ , सर्वत्र कौतुक –  ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

           नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही एकमेव संघटना निवड श्रेणी सारख्या प्रश्नावर सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे दिसले.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ने प्रश्न योग्य प्रकारे हाताळला यामुळे शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे. यामध्ये शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शालेय वेळेव्यतिरीक्त या कामास विशेष मदत केली.या आंदोलनामध्ये व इतर मदतीत संजय पगार,चारुशिला भोसले(लिपिक),सखाराम सोनवणे, प्रविण कोळी,दिपक आहिरे, किशोर मेणे, मारुती कुंदे,रमेश गोहिल,रावसाहेब जाधव, सुनिल आहिरे, संजय गवळी, वासुदेव बोरसे,राजेंद्र खैरनार, रवींद्र ह्याळिज, सुभाष बर्डे, भाऊसाहेब भदाणे, राजेंद्र पवार,सुदाम बोडके,दिपाली थोरात,अशोक पवार, अरविंद माळी,उत्कर्ष कोंडावार, शिवाजी ठाकरे,प्रभाकर नेरकर,आदींनी मोलाचे सहकार्य केले.संजय पगार यांनी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी,सर्व संबंधित लिपिक,सर्व गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती ओ.एस.यांचे आभार मानले. अभुतपूर्व यशानंतर जिल्हाभरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्याची चर्चा आहे. तरी सर्व तालुक्यांत शिक्षक परिषदेच्या कार्यकारिण्यांमध्ये उत्स्फूर्तपणे शिक्षक सहभागी होत आहे.

 “निवड श्रेणी प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असल्याने सदरील आंदोलन हे जवळपास एक ते दीड वर्ष चालले यापुढेही पगारात लागु करुन फरक काढणे कामी मोहिम राबवणार, शिक्षकांचे गंभीर प्रश्नावर आंदोलने व न्यायालयाच्या माध्यमातून प्रशासनाला प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी भाग पाडणार” – संजय बबनराव पगार(संस्थापक कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग) आदर्श शिक्षक संघटन-शिक्षक परिषद

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१० 

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 6

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!