





146 खासदार निलंबन व मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात इंडिया आघाडीचे नाशिकला निषेध निदर्शने आंदोलन

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :शनिवार : दि. 23 डिसेंबर 2023
β⇔सुरगाणा , ता. 22 ( प्रतिनिधी – पांडुरंग बिरार ) :– नाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संसदेमध्ये सुरु असलेले हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बाजू मांडत असताना इंडिया आघाडीच्या 146 खासदारांना निलंबित केले आहे. मोदी सरकारच्या संसदेतील त्या निर्णया विरोद्धात विरोधी पक्षाच्या खासदारांना संपवण्याचे षडयंत्रण मोदी सरकारकडून सुरू आहे.त्यामुळे लोकशाहीची हत्या झाली असून हे षडयंत्र दबाव टाकून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व कामगार वर्गाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. या सरकारच्या धोरणा विरोधात इंडिया आघाडीच्या वतीने नाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध निदर्शने आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलना प्रसंगी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष , शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष , उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष व आम आदमी पार्टी आदि पक्षासह बहुसंख्येने आंदोलनकर्ते, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०