0
1
4
9
2
1
त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. ५ , सप्टेंबर २०२३
β⇒ त्र्यंबकेश्वर , ता .५ ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :- नाशिक जिल्ह्यासह देशभर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली . त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मविप्र संस्थेचे कला , वाणिज्य व विज्ञान वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय , माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात रांगोळी , भित्तिपत्रके आदी उपक्रमाबरोबरच शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर सर्व प्राध्यापक व शिक्षकांचा पुष्गुच्छ देवून विद्यार्थ्यानी सन्मान केला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साह संपन्न झाला.
कार्यक्रमांचे आयोजन प्रा. डॉ. राजेश झनकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. शरद कांबळे, प्रा. नीता पुणतांबेकर, प्रा. उत्तम सांगळे , प्रा. डॉ. अजित नगरकर, प्रा. विद्या जाधव, प्रा. अनील खेडकर, प्रा. निखील सोनवणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रघुवीर चौधरी आदीसह व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विविध विद्यार्थ्यांनी उत्स्पूर्त आपले शिक्षक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. शेवटी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ . राजेश झनकर व प्रा. डॉ. शरद कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रा. डॉ. भागवत महाले, प्रा. डॉ. संदीप माळी ,प्रा. डॉ. दिनेश उकिरडे, प्रा. समाधान गांगुर्डे , प्रा. संदीप गोसावी, प्रा. प्रशांत रनसुरे, प्रा. मनोहर जोपळे, प्रा. आशुतोष खाडे, प्रा. नीलेश म्हारसाळे, प्रा . स्वप्निल जगदाळे, प्रा. किरण शिंदे, प्रा. संकेत भोर, प्रा . पोपट बिरारी, प्रा. विष्णू दिघे , डॉ. वर्षा जुन्नरे, प्रा. शाश्वती निरभवने, डॉ. वैशाली जाधव, प्रा डॉ. सोनाली पाटील, प्रा डॉ.नयना पाटील, प्रा डॉ. सुलोक्षणा कोळी, प्रा डॉ मनीषा पाटील , प्रा. ललिता सोनवणे, प्रा. अर्चना धारराव, प्रा. जया शिंदे, प्रा. मंजुश्री नेरकर , प्रा. राजश्री शिंदे, प्रा. शीतल जमदाडे आदीसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थिनी कु.धनश्री माळवे हिने केले, तर आभार प्रदर्शन कु. पूजा महाले हिने केले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०