β : निफाड :⇒ जिल्हास्तरीय एकपात्री नाटक स्पर्धेत शुभम हाडोळे द्वितीय – ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )
β : निफाड :⇒ जिल्हास्तरीय एकपात्री नाटक स्पर्धेत शुभम हाडोळे द्वितीय - ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )
जिल्हास्तरीय एकपात्री नाटक स्पर्धेत शुभम हाडोळे द्वितीय
सायखेडा :जिल्हास्तरीय एकपात्री नाटक स्पर्धेत शुभम हाडोळे द्वितीय – ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि २ सप्टेंबर २०२३
β⇒ निफाड (सायखेडा) , ता २ ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ) :- के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक व मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु – शिष्य स्मृतिदिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . जिल्हास्तरीय एकपात्री नाटक स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या त्यात जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयाचा विद्यार्थी कुमार शुभम रमेश हाडोळे याने जिल्हास्तरीय एकपात्री नाटक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून नेत्र दीपक यश संपादन केले .त्याला रोख रुपये बाराशे व स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले
सदर स्पर्धेत त्याला भोई सरांचे विशेष मार्गदर्शन लाभले , त्याच्या यशाबद्दल मविप्र निफाड तालुका संचालक – शिवाजी आप्पा गडाख शालेय उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष कमलकांताचार्य महाराज शालेय समितीचे अध्यक्ष विजूआण्णा कारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावले, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जगन आप्पा कुटे, विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ निकम, पर्यवेक्षक दौलत शिंदे, सर्व समिती सदस्य यांनी कौतुक केले आहे.
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०