Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

β : नागपूर :⇒   भारतीय चांद्रयान -3 मोहिम यशस्वी, विश्व भारातून  भारताचे कौतुक ! –  (  प्रतिनिधी – रमेश लांजेवार )

β : नागपूर :⇒ (  प्रतिनिधी - रमेश लांजेवार ) भारतीय चांद्रयान -3 मोहिम यशस्वी, विश्व भारातून  भारताचे कौतुक !  (  प्रतिनिधी - रमेश लांजेवार )

0 0 2 3 9 9

 भारतीय चांद्रयान -3 मोहिम यशस्वी, विश्व भारातून  भारताचे कौतुक ! 

β:⇒  दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक ! गुरुवार, दि . २३,  ऑगस्ट -२०२३ 
β:⇒ नागपूर : दिव्य भारत बी एस एम न्यूज प्रतिनिधी – रमेश लांजेवार ) :- भारतीय वैज्ञानिक शुन्यातून विश्व उभारू शकते हे चांद्रयान-3 च्या माध्यमातून जगाला दाखवून दिले. भारत भुमि अशी आहे, की हजारो वर्षांपासून थोर साधुसंत, महाज्ञानी, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ,आयुर्वेद शास्त्रज्ञ यामध्ये तर्बेज आहेत. त्याचीच प्रतिकृती आज आपल्याला चांद्रयान -3 च्या सफल मोहीमेवरून दिसून येते.चांद्रयान -3 च्या यशस्वी मोहीमेसाठी भारतातील संपूर्ण धर्माच्या लोकांनी ईश्वराजवळ प्रार्थना केली व ईश्वराने प्रार्थना स्विकारली.त्याचप्रमाणे भारत भुमि अनेक धर्मांनी आणि संस्कृतीनी परिपक्व आहे. त्यामुळे चंद्रासह संपूर्ण सृष्टी भारतीयांसाठी पुज्यनिय आहे. त्याचेच फलस्वरूप आज आपल्या शास्त्रज्ञांना प्राप्त झाले आहे.परंतु भारत कोणतीही गोष्ट किंवा निर्णय घाईगडबडीत घेत नाही. त्यामुळे सश्याच्या धुर्त गतीपेक्षा कासवाची चाल नेहमीच भारत पसंत करतो. कोणत्याही गोष्टीला वेळ लागला तर चालेल.परंतु विजय निश्चित झाला पाहिजे, याचं पध्दतीचे भारतीय वैज्ञानिकांचे असल्यामुळे आज आपण जगाला मागे टाकून चंद्रावर प्रवेश केलेला आहे.
                       भारतीय  इस्रो  संशोधन केंद्राने  जगाला  चांद्रयान -3 यशस्वी  झालेला आहे, हे मोहिमेवरून दिसून येते ही स्वागतार्ह व आनंदाची बाब आहे. दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश आहे.कारण इस्रोने जगात इतिहासरचुण विक्रम लॅंडर,प्रग्यान रोव्हरचे यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग झालेले आहे. दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोज बुधवार सायंकाळी ठिक 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरल्याने जगाच्या पाठीवर भारताचे व भारतीय वैज्ञानिकांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यामुळे देशाच्या संपूर्ण वैज्ञानिकांना कोटी – कोटी प्रणाम.याच काळात नुकतेच एकीकडे रशियाची चांद्रयान मोहीम अयशस्वी ठरली चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्यासाठी रशियाने “लूना 25” हे अवकाशयान चंद्रावर पाठवले असता अनियंत्रित होऊन दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोज शनिवारला नजीकच्या कक्षेत जात असतांनाच यानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला व चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले.यामुळे सुमारे गेल्या 46 वर्षांनंतर काढलेली चांद्रयान मोहीम रशियाची अयशस्वी ठरली.
                            शास्त्रज्ञांच्या मते असे सांगितले जाते की दक्षिण ध्रुवावर कायम अंधार असतो. त्यामुळे चंद्राच्या या भूभागावर फारशी माहिती शास्त्रज्ञांना नाही.मात्र येथे असलेल्या मोठमोठ्या खड्यांमध्ये पाणी असण्याची शक्यता आहे.भविष्यातील मोहिमांमध्ये येथील खडकांमध्ये गोठलेल्या स्वरूपात असलेल्या पाण्याचा वापर करून ऑक्सिजन आणि रॉकेटसाठी इंधन तयार करता येईल,असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. त्यामुळेच अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच उतरविण्यासाठी जगातील शास्त्रज्ञ प्रयत्नशील असतात.परंतु यात अनेक देश अयशस्वी झालेत.परंतु तेच काम जगातील कोणत्याही देशांनी केले नाही ते भारतमातेच्या पुत्रांनी करून दाखविले ही अत्यंत स्वाभिमानाची व गौरवास्पद बाब आहे.त्यामुळे शास्त्रज्ञांच जितकं कौतुक कराल तीतक कमीच आहे.भारत अनंतळापासुन संघर्ष करीत आहे.परंतु भारताने नेहमीच संघर्षाचे मंथन करून नेहमीच अमृत काढले.याच संघर्षामुळे आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यास सफल झालो.या मोहिमेत देशाच्या महान शास्त्रज्ञांनी आपल्या चमू सोबत अहोरात्र मेहनत घेऊन चांद्रयान मोहीम यशस्वी केली.यात मुख्यत्वे करून एस.उन्नीकृष्णन नायर संचालक विक्रम साराभाई स्पेस सेंटर यांनी चांद्रयान -3 ची विविध कार्याची जबाबदारी स्वीकारली, पी.वीरमुथ्थुवेल प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रावरील अनेक संशोधनाच्या बाबतीत ख्याती,डॉ.एस.सोमनाथ इस्रो प्रमुख चंद्रयान-3 च्या बाहुली रॉकेटला डिझाईन केले. डॉ.के.कल्पना असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर, एम.शंकरन डायरेक्टर यूआर राव सॅटेलाईट सेंटर(युआरएससी) यांनी इस्रोच्या सेटलाईटला डिझाईन केले,ए.राजराजन डायरेक्टर लॉंच अथोरायझेशन बोर्ड (एलएबी) कंपोझिट क्षेत्रातील तज्ज्ञ,एस.मोहनकुमार मोहीम डायरेक्टर इत्यादींच्या महत्वपूर्ण अथक प्रयत्नाने आपण दक्षिण ध्रुव गाठु शकलो.हे आज चांद्रयान -3 च्या मोहिमेचे खरे शिल्पकार आहेत.चंद्रावर पाऊल ठेवणारे आतापर्यंतचे 4(चार) देश झालेत सोव्हिएत रशिया (1966), अमेरिका (1966), चीन (2013),भारत (2023) परंतु दक्षिण ध्रुवावर लॅंड करणारा भारत हा जगातील पहिला  व एकमेव देश आहे.आज भारत अनेक क्षेत्रांत प्रगती पथावर आहे.जागतीक विश्व गुरू, जगातील शांतीचे प्रतीक म्हणून भारताची जगात ओळख आहे आणि आता चांद्रयान मोहीम फत्ते झाल्यानें संपूर्ण विश्वाचे लक्ष भारताकडे लागले आहे.त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील 140 कोटी जनता मग ती कोणत्याही धर्माची असो आकार-पाताळ-पृथ्वी,चंद्र-तारे-सुर्य यांची पुजाअर्चना करतात.त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक वृक्षांना, फळांना, फुलांना आगळेवेगळे महत्व आहे त्यामुळे याचीही जोपासना पुजेच्या माध्यमातून केली जाते.नदी,तलाव,समुद्र ही संपूर्ण सृष्टी भारतवर्षासाठी पुज्यनिय आहे.एक म्हण आहे “सब्र का फल मिठा होता है” तेच आज आपण चांद्रयान-3 यशस्वी मोहीमेवरून समजु शकतो.यांनंतरही पुढील कार्य व मोहीम यशस्वी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.जय हिंद!
                                                                                लेखक :⇒
                                                                                                                           रमेश कृष्णराव लांजेवार
                                                                                                            (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
                                                                                                                मो.नं.9921690779, नागपूर.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!