येडशी प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लूट, रुग्णसेवेचीत्रासदायक परिस्थिती
β : येडशी(धाराशिव) :⇔येडशी प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लूट,रुग्णसेवेची त्रासदायक परिस्थिती-(प्रतिनिधी : सुभान शेख)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार :दि, 01 ऑक्टोबर 2024
β⇔येडशी(धाराशिव),दि,01(प्रतिनिधी : सुभान शेख):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांपासून खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून इंजेक्शनसाठी ७० ते १०० रुपये आकारले जात आहेत. औषधांच्या चिठ्ठीवर फक्त गोळ्या लिहून देण्यासाठी ५० रुपये आकारले जात असल्याची तक्रार आहे.येडशी गावात सुमारे ३०% लोकसंख्या ही कामगार आणि मजुरी करणाऱ्यांची आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण आहे. या परिस्थितीत त्यांना उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधांचा आणि सुविधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. येडशी गावाची लोकसंख्या सुमारे २५,००० असून, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येडशीसह आजुबाजूच्या खेड्यांतील नागरिक, महिला, वृद्ध आणि लहान मुलांना उपचारांसाठी ये-जा करावी लागते. परंतु, येथे साधी खोकल्याची औषध बाटली सुद्धा वेळेवर उपलब्ध नसते. ग्रामस्थांच्या मते, शासनाने पाठविलेल्या औषधांचा हिशेबच नसतो, आणि अनेकदा औषधांचा तुटवडा जाणवतो. यामुळे येडशी “प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांसाठी आहे, की स्वतःची सोय बघण्यासाठी?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामस्थांनी आरोग्यमंत्री यांच्याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, असे आवाहन केले आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची आर्थिक लूट होत आहे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णसेवेचा अभाव जाणवतो, अशी गंभीर स्थिती येडशी गावातील आरोग्य व्यवस्थेत पाहायला मिळत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जनता विद्यालय बारावी निकालाची उज्वल परंपरा कायम-(प्रतिनिधी-सुभान शेख)
2 weeks ago
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
3 weeks ago
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
3 weeks ago
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
4 weeks ago
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
4 weeks ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 weeks ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)