β : सिन्नर( नाशिक) :⇔जरांगे पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत हाणामारी-( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )
β : सिन्नर( नाशिक) :⇔जरांगे पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत हाणामारी-( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )
जरांगे पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत हाणामारी
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.1 मार्च 2024
β⇔सिन्नर( ( नाशिक),दि1( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):-लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून एक उमेदवार उभा करावा त्या संदर्भात ३० तारखेच्या आत बैठका घेऊन निर्णय कळवा असे ,आव्हान मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं होत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या वतीने बैठकांचे अनेक ठिकाणी आयोजन केले जात आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी कोणता उमेदवार ठरवायचा यासाठी या आढावा बैठकामध्ये चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील मराठा समाजाच्या वतीने बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत मोठा राडा झाला आहे. हाणामारीची घटना देखील घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बैठकीत उमेदवार ठरवताना वाद झाला एकमत न झाल्याने हा वाद विकोपाला गेला आणि एकमेकांवर हल्ला करण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही उमेदवाराचं नाव समोर आलं नाही. पण समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली, काही काळ तणाव निर्माण झाला होता, बैठकीतील कार्यकर्त्यांनी सांगितले की मराठा समाजाच्या चार-पाच लोकांनी मीटिंग ठरवली होती मिटींगचे मेसेज पाहून अनेक जण आले, बैठकीत कुणीही कुणाचे नाव न घेता चर्चा सुरू होती.त्याचे अपडेट मनोज जरांगे पाटील यांना देण्याचं ठरलं होतं . मात्र अचानक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि जोरदार राडा झाला. अशी माहिती उपस्थित कार्यकर्त्यांनी दिली . दरम्यान बैठकीत वाद झाल्यानंतरही कार्यकर्त्यांनी परिस्थिती सावरली आणि पुन्हा एकदा बैठक घेण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी बैठका सुरू असून अद्याप बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती समोर आलेली नाही.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510