Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसाहित्यिक

β : नागपूर :⇔ जगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज, 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस – ( प्रतिनिधी : रमेश  लांजेवार)

β : नागपूर :⇔ जगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज, 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस - ( प्रतिनिधी : रमेश  लांजेवार)

0 0 2 3 9 8

जगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज, 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस रमेश कृष्णराव लांजेवार 

β : नागपूर :⇔ जगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज, 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस - ( प्रतिनिधी : रमेश  लांजेवार)
β : नागपूर :⇔ जगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज, 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस – ( प्रतिनिधी : रमेश  लांजेवार)

 β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि. 25 नोव्हेंबर 2023       

β⇔नागपूर, ता 25 ( प्रतिनिधी : रमेश  लांजेवार) :-  जग विनाशाकडे वाटचाल करीत आहे.याकरीता जगाने पर्यावरण वाचविण्यासाठी संपूर्ण ताकदीनीशी पर्यावरणाचे संतुलन ठेवुन संरक्षण करण्याची गरज आहे. वाढते प्रदुषण रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. पर्यावरणाची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रानी पर्यावरणाच्या प्रती  वैश्विकस्तरावर आणि राजनीतीक व सामाजिक जागृती आणण्याकरिता संयुक्त राष्ट्राने 26 नोव्हेंबर 1992 ला “विश्र्व पर्यावरण संरक्षण दीवस” साजरा करण्याची सुरुवात केली.त्यामुळे संपूर्ण जगात 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो.आज संपूर्ण जग सुरक्षीत रहावे असे सर्वांना वाटते.परंतु जगातील मानवांच्या अतीरेकामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड, खणन, नदीतील रेती खणन त्याचप्रमाणे सोने, चांदी,हिरे, कोळसा व खनिज संपत्ती इत्यादीवर मानवाने सरळ घणाघाती प्रहार करून निसर्गाच्या मुळावरच मानवाने कुह्राड मारून घाव केल्याचे दिसून येते यामुळे निसर्गाचे संतुलन डगमगतांना दिसत आहे. पर्यावरणाची ढासळती परीस्थिती पहाता पृथ्वीतलावरील संपूर्ण मानवजाती व जीव-जंतु भयभित झाल्याचे दिसून येते.त्यामुळे आज जगाला पर्यावरणाचे संरक्षण कसे करता येईल याकडे सर्वांनीच लक्ष केंद्रित केले पाहिजे.भारतात जंगल, पशु-पक्षी व प्राणी यांना सरकारकडुन संरक्षण मिळावे यासाठी 26 मार्च 1974 ला गढवाल मधील हेनवलघाटी येथे गौरादेवी यांच्या नेतृत्वाखाली”चिपको आंदोलनास सुरूवात झाली व पर्यावरण संरक्षणाची मिसाल जागृत केली.आज तसे पाहिले तर स्थल,जल,वायु मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाल्याचे दिसून येते.

                   मानवाने जर पर्यावरणाला वाचविले तर जलप्रदूषण, वायुप्रदूषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरपूर मदत मिळु शकते.आज पर्यावरणात इतके प्रदुषण दीसुन येते की पक्षांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे. आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात जंगल तोड मोठ्या प्रमाणात होत आहे.याचाच परीणाम पर्यावनावर मोठ्या प्रमाणात होतांना दिसतो.भारतासह जगातील वाढती लोकसंख्या हीच पर्यावरण नियंत्रण ठेवण्यास मोठी अडचण असल्याचे मी समजतो.मानवाने आपल्या सुख-सुविधांसाठी पर्यावरणाकडे पुर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.आज पर्यावरणावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की “जगावं की मरावं” कारण आज पर्यावरणाचा आधारस्तंभ “वृक्ष”आहे व त्याला साथ हवी जल व वायूची परंतु हे संपूर्ण दुषित झाल्यामुळे पर्यावरण धोकादायक स्थितीत पोहोचले आहे.असेही सांगण्यात येते, की पर्यावरणाच्या ढासळत्या परिस्थितीमुळे जगातील 10 लाख प्राणी व वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.ज्या पक्ष्यांवर पर्यावरणाची धुरा आहे ते गिधाड पक्षी सुध्दा संपुष्टात येत आहे.मानवाने निसर्गावर एवढा अत्याचार केला की वृक्ष कटाईच केली नाही तर वृक्षांना जळामुळा सकट त्याला उपडुन फेकले.यामुळेच आज पर्यावरण मानवापासुन भयभीत आहे. आज औषधोपयोगी वनस्पती पर्यावरणाच्या ढासळत्या परीस्थितीमुळे नस्तनाबुत होत आहे.त्याचप्रमाणे अनेक औषधोपयोगी वनस्पती लुप्त झाल्या आहेत.जगातील वाढत्या प्रदूषणामुळे 30 टक्के वृक्षप्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि विविध देशांतील 142 प्रजाती याआधीच पृथ्वीतलावरून लुप्त झाल्या आहेत ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बाब आहे.भारतात वृक्षांच्या 2603 प्रजाती आहेत यातील 469 प्रजाती धोकादायक स्थितीत आहेत म्हणजेच भारतातही गंभीर समस्या आहे.आज पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत झाल्यामुळे जंगलातील संपूर्ण प्राणी शहरात व गावात प्रवेश करतांना दिसतात.यात हिंसक प्राणी शहरात व गावात प्रवेश करून मानव हानी व पाळीव प्राण्यांची हानी मोठ्या प्रमाणात होतांना दिसते.यामुळे जंगली प्राणी व मानव यांच्यात मोठ्या प्रमाणात शत्रृत्व दिसून येते.कारण जंगल संपदा नष्ट होत आहे यामुळे जंगलात रहाणारे पशु-पक्षी यांचे खान-पान ऐका-मेकांवर अवलंबून असते.परंतु जंगल तोडीमुळे अनेक प्राण्यांच्या व पक्षांच्या प्रजाती लुप्त होतांना दिसते किंवा त्यांची शिकार होतांना दिसते किंवा पर्यावणाच्या ढासळत्या परीस्थितीमुळे मृत्यृशी झुंज देतांना अनेक पशु-पक्षी दीसतात.त्यामुळे आज पर्यावरणाचे संरक्षण करण्याची प्रथम जबाबदारी मानवजातीची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.आज
           प्लास्टीकनेसुध्दा पर्यावरणाला प्रदुषीत केल्याचे दिसून येते.मानवाने स्वत:च्या स्वर्थासाठी पर्यावरणाचे जनुकाय संपूर्ण रक्त पीवुन निचोडुन ठेवल्याचे दीसुन येते.आज जगात विश्र्व शांतीसाठी पर्यावण वाचवीण्याची गरज आहे.आज मानवजातींमध्ये वाढणाऱ्या बिमाऱ्या, अनेक व्याधी व आरोग्याची ढासळती परिस्थिती ह्या सर्व पर्यावरणाच्या बिघडत्या संतुलनामुळे दिसून येतात.यामुळे आज मानवाचे आयुष्यमान दिवसेंदिवस कमी होतांना दिसून येते. पशुपक्षांचेतर जगने अत्यंत कठीण झाले आहे.जगात वाढते कारखाने आणि जगातील युध्दसामुग्रीची शर्यत व अनेक परमाणु परिक्षण यामुळे संपूर्ण जग प्रदुषीत होतांना दिसते.आज भारतातील जिवंत उदाहरण म्हणजे “भारताची राजधानी दिल्ली” प्रदुषणाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगितले जाते.याचाच अर्थ असा की दील्ली आज प्रदुषणाच्याबाबतीत महाभयानक परीस्थिती असल्याचे दिसून येते.आज प्रदुषणामुळे दिल्ली गॅसचेंबर बनले की काय असे वाटत आहे.या महाभयानक परीस्थितीत दील्लीवासी “मास्क”चा मोठ्या प्रमाणात वापर करतांना दिसतात.यामुळे असे वाटते की “दील्लीमध्ये मास्क युग आले की काय असे वाटत आहे”. संयुक्त राष्ट्राने 1992 ला पर्यावरण संरक्षण करण्याची संकल्पना जाहीर केली होती.परंतु याबद्दल कीती देश अलर्ट व सजन आहे हे पहाने गरजेचे आहे.पर्यावरण संरक्षण करण्याची घोषणा करणे वेगळे आहे.परंतु त्याला कृतित कोणता देश रूपांतरित करतो त्याला जास्त महत्त्व आहे.कारण आज संपूर्ण जग बारूदच्या ढीगाऱ्यावर बसलेले आहे.याचे उदाहरण म्हणजे अझरबैजान-आर्मेनिया युद्ध आणि गेल्या 19 महिन्यांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आणि आता सुरू असलेले हमास-हिजबुल्ला विरूद्ध इस्रायलचे भयावह युद्ध. त्यामुळे मानवजातीने आपल्या मृत्यृचीही व्यवस्था केल्याचे दिसून येते.मानवजातीने आता पर्यावरण वाचवीले नाही तर पृथ्वीचा विनाश अटळ आहे.याकरीता जगातील संपूर्ण देशांनी विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवसाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला पाहिजे.

                 आज पर्यावरण संरक्षणा करीता लोकसंख्येवर नियंत्रण असने गरजेचे आहे, वाढते शहरीकरण थांबवीले पाहिजे, कारखान्यांतील धुळ व दुषीत पाणी यांचा बंदोबस्त केला पाहिजे,भारतासह जगात अनेक वाहन दुषीत धुर ओकत असतात ते कुठेतरी थांबवीले पाहिजे.आज पर्यावरण विस्कळीत झाल्यामुळे व प्रदुषणामुळे मानवजातीच्या आरोग्यावर संकट ओढावले आहे यात कॅन्सर,टीबी, मधुमेह,हार्ड अटॅक, डोळ्यांचा त्रास इत्यादी सह अनेक बिमाऱ्या मोठ्या प्रमाणात दीसुन येतात.आज भारत प्रगतीपथावर आहे.परंतु पर्यावरणाच्या बाबतीत मागे असल्याचे दिसून येते.याचे जीवंत उदाहरण म्हणजे”दील्लीतील प्रदुषण”. त्यामुळे भारताने मुख्यत्वे करून पर्यावरण संरक्षणासाठी युध्दपातळीवर कार्य करण्याची गरज आहे.गेल्या 5 ते 10 वर्षांपासून जगात अनेक महाप्रलय, मोठ्या प्रमाणात सुनामी,ग्लेशीअर वितळने,अती पाऊस,अती उष्णता,अती थंडी,वनवे लागुन मोठ-मोठे जंगल संपदा जळुन खाक होने,भुकंप येणे ह्या संपूर्ण घटना निसर्गाचे संतुलन डगमगल्याने व पर्यावरणाची खुली हत्या केल्याने ह्या घटना घडल्याचे स्पष्ट दीसुन येते.त्यामुळे आज पर्यावरणाला वाचविण्याकरिता जगातील संपूर्ण देशांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.भारतात शहरांचे सौंदर्यकरन करण्याच्या उद्देशाने जंगल तोड करने बरोबर नाही.त्यामुळे भारत सरकारने जंगल तोड ताबडतोब थांबवली पाहिजे.यामुळे पर्यावण शुद्ध राहिल.पर्यावरन संरक्षण दिनाच्या निमित्ताने मी सरकारला एकच आव्हान करतो, की जंगल तोड ताबडतोब थांबवली पाहिजे व ओसाड जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायला पाहिजे.त्याचप्रमाणे जनतेला मी एकच आव्हा करतो की 26 नोव्हेंबर पर्यावरण संरक्षण दीवसाचे औचित्य साधून या दीवशी प्रत्येकाने आपल्या घरासमोर एकतरी झाड लावावे जागा नसेल तर एखाद्या कुंडीत झाड लावावे व पर्यावरणाचे संरक्षण करावे.त्याचप्रमाणे सरकारने “घर तीथे झाड” ही मोहीम राबविली पाहिजे. वृक्ष लागवडीमुळे “गुरांना चारा,पक्षांना आणि मानवाला फळ व सर्वांना सावली आणि ऑक्सिजन मिळेल”यांच्या संगमाने शुध्द हवा मिळुन पर्यावरणात आल्हाददायक वातावरण निर्माण होईल.

              आज संपूर्ण जगाला पर्यावरण वाचवीण्याची हीच संधी आहे.ही संधी गमावून नये असे मला वाटते.आज पर्यावरण प्रदुषीत झाल्यामुळे नदी,नाले,तलाव, समुद्र प्रदुषीत झाले आहे.यामुळे जलचर प्राण्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालेला आहे.त्यामुळे आज पर्यावरणाचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी विश्र्वातील संपूर्ण मानवजातीवर आहे त्या अनुषंगाने सर्वांनी पावुले उचलली पाहिजे.पर्यावरण सुरक्षीत तर पृथ्वी सुरक्षीत,पृथ्वी सुरक्षीत मानव, पशु-पक्षी सुरक्षीत हेच धेय्य पुढे ठेवून पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे.आजच्या अत्याधुनिक युगात “मोबाईल टॉवर” मोठ्या प्रमाणात दीसुन येते यामुळेसुध्दा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतांना दिसतो.यावरसुध्दा नियंत्रण आणन्याची गरज आहे.साडे तिनशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी निसर्गाचे, पर्यावरणाचे आणि झाडांचे महत्व आपल्या अभंगातून सांगितले होते आणि त्याचे आज अनुकरण होण्याची गरज आहे. 
 वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे ! पक्षी सुस्वरे ! आळविता !! येणे सुख रूचे एकांताचा वास ! नाही गुणदोष ! अंगीयेता !!   
लेखक :- रमेश कृष्णराव लांजेवार.
                                                                                                (माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर) मो.नं.9921690779                                                                                                           नागपूर,

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो .८२०८१८०५१० 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 8

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!