





अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट गीतांवर आधारित १३ ऑक्टोबर रोजी ‘रंग बरसे’ कार्यक्रमाचे आयोजन

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि 08 ऑक्टोबर 2024
β⇔नाशिकरोड ता.08 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ):- नाशिकरोड: जय भवानी रोड येथील आशा मेलोडी प्रस्तुत अमरकुमार यांच्या नेतृत्वाखाली महानायक अमिताभ बच्चन यांच्या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांवर आधारित हृदयस्पर्शी कार्यक्रम ‘रंग बरसे’ चे आयोजन रविवार, १३ ऑक्टोबर २०२४ रोजी शालिमार येथील प. स. नाट्यगृहात करण्यात आले आहे.
या संगीतमय संध्याकाळेत अमरकुमार आणि प्रसिद्ध गायक संजय रासकर, जगन चव्हाण, संजय परमसागर, गॉडविन लुईस, अर्चना सोनवणे, श्याम शहाणे, अनिल पांचाळ, नेहा आहेर, आरती चव्हाण, प्रज्ञा गोपाळे आदी कलाकार अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील लोकप्रिय गाणी सादर करणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नंदकुमार देशपांडे, नितीनकुमार चव्हाण, उमेश गायकवाड, इरफान मास्टर, आणि संजय अडावदकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे यांच्या देखरेखीखाली होणार असून कार्यक्रमाचे निवेदन दिनेश गोविल करणार आहेत.या मनमोहक संगीतमय कार्यक्रमाचा आनंद रसिकांना विनामूल्य घेता येणार आहे. आयोजकांनी सर्व रसिकांना या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )