





किशमिश आणि मनुका या मध्ये कोणता फरक आहे जाणून घ्या; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 3 जून 2024
β⇔नाशिक, दि.3 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- किसमिस आणि मनुका दिसायला अगदी एकसारखे आहे. पण त्याचे पोषक तत्व वेगवेगळे आहे. किसमिस आणि मनुका दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक लोक यांना एकच समजतात ,पण दोन्ही मध्ये खूप अंतर आहे. किसमिस आणि मनुका ड्रायफ्रूट्स लिस्टमध्ये सहभागी आहे. किसमिस खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तर मनुका खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते. किशमिशचा आकार छोटा आणि बारीक असतो, मनुका मोठी आणि जाड असते. किशमिशचा रंग थोडा हलका असतो. तर मनुका डार्क ब्राऊन कलरचे असते.
किशमिशची चव थोडी आंबट असते आणि मनुका गोड असते. छोट्या द्राक्षांना वाळवून किशमिश तयार केली जाते यामध्ये बिया नसतात. मनुका मोठे आकाराचे द्राक्ष वाळवून तयार केले जाते. मनुकामध्ये अनेक बिया असतात. किशमिशचे फायदे किशमिशमध्ये आयरन, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम कॉपर, आणि मॅग्नीज असते. किशमिशला विटामिन बी सिक्सचा सोर्स मानले जाते. किसमिस खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. फायबरने भरपूर किसमिस पुरुषाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लहान मुलांना शारीरिक आणि मानसिक विकास जलद करते. भिजवलेले किशमिश खाल्ल्याने वजन कमी होते. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी किसमिस खाणे फायदेशीर मानले जाते.
मनुक्याचे फायदे – मनुकामद्धे भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, विटा कॅरोटीन, ॲक्टीबॅक , गुण असतात .शरीरात रक्त वाढण्यासाठी मनुका मदत करते. फायबर युक्त भरपूर मनुका खाल्ल्याने पाचन मजबूत होते .एनीमियाच्या रुग्णांनी मनुका खावा , ब्लड प्रेशर कमी झाल्यास मनुका खावा ,हार्ड हेल्थ आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करण्यासाठी मनुका खाणे चांगले असते. मणूका दुधात किंवा पाण्यात भिजवून खाल्ल्यास फायदे मिळतात.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)