आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
β : नाशिक:⇔”नाशिक -सिन्नर” रस्त्याची दुरवस्था खासदार आक्रमक, प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम’:खासदार-राजाभाऊ वाजे-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक:⇔"नाशिक -सिन्नर" रस्त्याची दुरवस्था खासदार आक्रमक, प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम':खासदार-राजाभाऊ वाजे-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
0
1
2
3
6
7
“नाशिक -सिन्नर” रस्त्याची दुरवस्था खासदार आक्रमक, प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम’: खासदार- राजाभाऊ वाजे
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 06 सप्टेंबर 2024
β⇔ नाशिक,दि.08 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ): आज-काल शहरातील सर्वच रस्त्याची दुरावस्था झाली आहे. शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या “नाशिक – पुणे” रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. नागरिक बेजार असून यावर संतप्त खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. अवघ्या काही महिन्यापूर्वी आचारसंहितेच्या तोंडावरच नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती आणि अस्तरीकरण करण्यात आले होते. त्यावर सुमारे २० कोटी रुपयाचा खर्च झाला, मात्र अवघ्या दोन महिन्यातच त्या रस्त्याची अक्षरशा चाळण झालेली आहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे झाल्याने वाहतुकीची कोंडी होत असून गती मंदावली आहे रोज अपघात होत असल्याने अनेक नागरिक त्रस्त असून याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याची दखल शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी घेतली आहे.
दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातच अल्टिमेटम दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला या रस्त्यावरील खर्च बरोबर झाला आहे का? कामाची गुणवत्ता तपासले आहे का ? प्रशासकीय पूर्तता केली आहे का ? आणि तसे असेल तर या रस्त्याची एवढी दुरावस्था झाली याला जबाबदार कोण? असा प्रश्न खासदार वाजे यांनी केला आहे. द्वारका ते नाशिक रोड दरम्यानच्या नाशिक – पुणे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १९. ४२कोटी रुपये खर्च झाले, त्यातून रस्त्याचे अस्तरीकरण करण्यात आले, असे असतानाही प्रचंड खड्डे झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर चिखल आणि निसरडा रस्ता अशी स्थिती झाली आहे. रस्त्याच्या या अवस्थेमुळे सर्वाधिक वाहतूक असलेल्या या भागातील नागरिकांची प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना जीवमुठीत घेऊन या रस्त्यावरून जावे लागत आहे. या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात कामाच्या दर्जाची तपासणी करण्याची मागणी केलेली आहे.
“नाशिक – पुणे” या महामार्गाच्या कामाचा दर्जा आणि उनिवा लक्षात घेऊन संबंधित ठेकेदारावर गंभीर कारवाई करावी, रस्त्याच्या ठेक्याच्या नियमावलीचे पालन झालेले आहे का ? रस्त्याच्या डाग डुगीला ठेकेदाराला जबाबदार धरण्यात आले आहे का ? आणि तसे नसेल तर तातडीने या रस्त्याची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करण्यात यावी. अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. याबाबत संतप्त झालेल्या खासदारांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित विभागाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. पंधरा दिवसात संबंधित रस्त्याचे योग्य दुरुस्ती न झाल्यास नागरिकांना घेउन प्रशासनाला विचारण्यात येईल. या विरोधात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या नाशिक शहरातील बहुतांश रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे, त्याविषयी मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. रस्त्याची कामे केल्यानंतर देखील दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेने कंत्राट दारावर 31 कोटी ची खैरात केली आहे. याबाबत शहरातील आमदारांनी गेल्या आठवड्यात आक्रमक होत आयुक्तांना जाब विचारला होता. आमदारांनी देखील प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. अल्टिमेट टर्म वर काम करणारे प्रशासन नागरिकांनी सुरक्षितता आणि रस्त्याची दुरुस्ती यावर किती गंभीर आहे हे लवकरच स्पष्ट होईल.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
0
1
2
3
6
7