β : सिन्नर ( नाशिक):⇔गद्दारांना धडा शिकवा उद्धव ठाकरे यांचे आव्हान-( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )
β : सिन्नर ( नाशिक) :⇔ गद्दारांना धडा शिकवा उद्धव ठाकरे यांचे आव्हान-( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )
गद्दारांना धडा शिकवा उद्धव ठाकरे यांचे आव्हान
β : सिन्नर ( नाशिक) :⇔ गद्दारांना धडा शिकवा उद्धव ठाकरे यांचे आव्हान-( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ) β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.1 मार्च 2024
β⇔सिन्नर ( नाशिक),दि 1( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):-महाविकास आघाडी तर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. श्री वाजे यांनी सेना प्रमुख पदाधिकाऱ्यासोबत ‘मातोश्री ‘ वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा, पाठीत खंजीर खूपसणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, अशी आवाहन केले.
पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर ,सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड , माजी आमदार वसंत गीते , माजी आमदार निर्मला गावित , महानगर प्रमुख विलास शिंदे जयंत भिडे ,माजी महापौर विनायक पांडे, भाई इंदुलकर, मुशीत सय्यद ,संजय चव्हाण , सचिन मराठे ,असलम मनियार , महेश बडदे , देवानंद वीरारी , राहुल ताजनपुरे , आधी यावेळी उपस्थित होते. यावेळी वाजे यांना उद्देशून बोलताना ठाकरे म्हणाले प्रचार करा , महाविकास आघाडीच्या कार्यकाळात घेतलेले जनहिताची निर्णय ,भारतीय जनता पक्षाने केलेली घरफोडी, गद्दारांनी पक्षाला दिलेला दगा, जनतेपर्यंत पोहोचवून आपल्या उमेदवारीचा ताकदीने प्रचार करा. विजय होऊन या असे आदेश ठाकरे यांनी दिले प्रारंभी वाजे यांनी आभार मानले. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ करू असे सांगितले, जिल्हाप्रमुख बडगुजर व संपर्कप्रमुख गायकवाड यांनी वाजे यांना विजयी करण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता जीवाचे रान करेल असा विश्वास व्यक्त केला .
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510