दिव्य भारत बीएसएम न्यूज :बुधवार : दिनांक : २९ एप्रिल २०२६
कृषी विक्रेत्यांचा बेमुदत संप , विविध मागण्यांचे तहसील प्रशासनाला लेखी निवेदन
शेतकऱ्यांना खते, औषधी, बी -बियाणे मिळेना

मुदखेड :, (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड):
मुदखेड, (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड):-
मुदखेड तालुक्यांतील कृषी विक्रेत्यांनी केंद्र शासनाच्या जाचक अटी विरोधात बेमुदत संप पुकारला असून या आशयाचे लेखी निवेदन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना देण्यात आले आहे . कृषी विक्रेत्यांच्या बेमुदत संपामुळे शेतकऱ्यांना खत औषधी बी बियाणे मिळत नसून पिकांना वेळेवर जैविक खतांचा डोस मिळाला नाही तर उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केंद्र व राज्य शासनाने कृषी विक्रेत्यांवर जाचक अटी लावून वेटिस धरले जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे . कृषी विक्रेत्यांनी खत विक्री तत्काळ बंद करावी , अप्रमानीत एचटीबी टी कापूस बियाण्यावर कडक बंदी घालावी , सीलबंद पॅकिंग मध्ये विक्री केल्यास किंवा तपासणी दोष आढळल्यास विक्रेत्याला आरोपी न करता साक्षीदार बनवावे, तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढवणारी नवीन अधिसूचना रद्द करावी साथी पोर्टलची सक्ती थांबून कंपनी स्तरापूर्ती मर्यादित ठेवावी , रासायनिक खताच्या पुरवठा फॉर पद्धतीने करावा , व विक्री मार्जिन वाढवावी , गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलची रक्कम शासनाने तात्काळ अदा करावी , खरीप हंगाम २०२६ मध्ये युरिया व डीएपी वितरणाबाबतच्या सूचनांचा फेर विचार करावा , कंपन्याने विक्रेत्याकडून मुद्दत बाह्य कीटकनाशके परत घ्यावेत या प्रमुख मागण्यासाठी दि २७ रोज सोमवार पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे .
मुदखेड तालुक्यांतील कृषी विक्रेत्यांनी प्रमुख विविध मागण्या संदर्भातील तसेच बेमुदत संपावर असल्याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना कृषी विक्रेते तालुका असोसिएशन संघटनेच्या वतीने यांना देण्यात आले आहे . यावेळी कृषी तालुका असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण काचावार , सचिव दिगंबर गव्हाणे , वैभव पत्तेवार , फयाज पठाण , सुरज टिप्परसे , ईशान चक्रवार , शिवाजी कदम , अनिल काचावार, कैलास पचलींग , प्रवीण सूर्यवंशी , किरण काचावार यांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे .

कृषी विक्रेते विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले असल्याने शेतकऱ्यांना पिकांना लागणारा माल मिळत नाही संपावर तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांना खत, बी बियाणे ,औषधी साठा उपलब्ध होणार नाही. यामुळे पिकांना डोस न मिळाल्यास उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे .
दिव्य भारत बीएसएम न्यूज :बुधवार : दिनांक : २९ एप्रिल २०२६
