





मोहाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नविन इमारत उद्घाटन ,हिन्दुस्तान एरोनाटिक्स लिमिटेड (C S R) सामाजिक दाईत्व निधी मधून बांधकाम

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 14 फेब्रुवारी 2024
β⇔ मोहाडी, दि.14 (प्रतिनिधी : राजवर्धन निकम ):- हिन्दुस्तान एरोनाटिक्स लिमिटेड यांच्या C S R सामाजिक दाईत्व निधीमधून बांधलेल्या मोहाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नविन इमारत उद्घाटन आज दिनांक १५ रोजी दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे. मविप्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री ना. भारती पवार, एच.ए.एल संचालक ए.बी. प्रधान, सह्याद्री फार्म कार्यकारी संचालक विलास शिंदे, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रविण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपये खर्च करून ही भव्य दिव्य इमारत परिसरातील विद्यार्थ्यांच्या साठी उपलब्ध असणार आहे. मोहाडी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मोहाडी ग्रामपालिका सरपंच आशाताई लहांगे, उपसरपंच भाग्यश्री निखिल जाधव, ग्राम विकास अधिकारी शैलेश नरवाडे, मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी सर
मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510