Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताब्रेकिंगसंपादकीय

β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा  ( प्रतिनिधी : संजय परमसागर )

नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

0 0 2 6 6 6

बिटको महाविद्यालयात ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: बुधवार , 16 ऑगस्ट 2023

नाशिकरोड ,16  ( प्रतिनिधी : संजय परमसागर ):- “ आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत आपल्या स्वातंत्र्याला आज ७६ वर्ष पूर्ण झाली आहेत . हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासाची मिळाली नाही त्यासाठी मोठा लढा लढावा लागला . या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे , समानतेचे , ऐक्य , न्यायाचे आणि बंधुत्वाचे रक्षण करू या व सुराज्यनिर्मीतीच्या स्वप्नासाठी जात, धर्म, प्रांत या पलीकडे विचार व्हावा, राष्ट्राप्रती निष्ठा बाळगा, आपला देश समग्र सुसज्ज व बलशाली व्हावा ” असे प्रतिपादन करताना प्रभारी प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी  गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . त्याप्रसंगी त्या बोलात  होत्या  .
                   प्रारंभी डॉ. विजया धनेश्वर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यानंतर एनसीसी विद्यार्थ्यांनी परेड सादर करून ध्वजास मानवंदना दिली व या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली . याप्रसंगी उपप्राचार्य डॉ .अनिलकुमार पठारे , फ्लाईंग ऑफिसर डॉ. आकाश ठाकूर , आर्मी लेफ्टनंट डॉ.विजय सुकटे, डॉ. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी गणेश दिलवाले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. विशाल माने , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे , पर्यवेक्षिका प्रणाली खैरनार यासह नाशिकरोड केंद्रातील सर डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या डॉ. श्रद्धा देशपांडे , जयराम हायस्कूल , जे. डी. सी. बिटको हायस्कूल मुख्याध्यापक आर. एम. चौधरी , हेमलता तांबोळी , जगन्नाथ अहीरे , पर्यवेक्षक- दावल नंदन , दिपाली रसाळ , एन एस एस अधिकारी संतोष पगार , कुलसचिव राजेश लोखंडे यांसह सर्व विभाग प्रमुख , शिक्षक , शिक्षकेतर स्टाफ , पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर झालेल्या कार्यक्रमात नवीन नियुक्ती , नेट सेट व पीएचडी तसेच नवीन अचीव्हमेंट प्राप्त शिक्षकांचा सत्कार प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला .

 दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०

मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 6 6

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!