





मनाची एकाग्रता साधण्यासाठी सहजयोग ध्यानधारणा महत्वाची : सुवर्णा कोळपकर

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 8 जून 2024
β⇔नाशिकरोड ,दि.8 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):- “सहजयोग ही ध्यानधरणा करण्याचे तंत्र असून ती एक धार्मिक आणि साधना चळवळ आहे. प्रत्येक लहानांपासून, युवक व ज्येष्ठ अशा सर्वांमध्ये जागृत होउ शकणाऱ्या जाणिव जागृतीच्या मार्गाने मनावर ऐक्य, ताबा साधला जाऊन आपल्या अंतर्मनात आमुलाग्र बदल परिवर्तन होते.आपण घेत असलेल्या शिक्षणामध्ये सकाळी उठण्यापूर्वी, अभ्यास वाचन करण्यापूर्वी, परीक्षेच्या दिवसात पाच ते दहा मिनिटं सहजयोग ध्यानधारणा करा त्यामुळे मनाची एकाग्रता वाढीस लागते , ” असे सॉफ्ट स्किल ट्रेनर सौ. सुवर्णा कोळपकर यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात स्टाफ ट्रेनिंग अकॅडमी व विद्यार्थी मंच वतीने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ताणतणाव व्यवस्थापनसाठी सहजयोग ध्यानधारणा ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे स्पष्ट करून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक जिल्हा सहजयोग केंद्र समन्वयक प्रशांत कोळपकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, शताक्षी भामरे, रिद्धी कोळपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस. जी. निर्मल यांनी केले. यावेळी प्रशांत कोळपकर यांनीही मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी, ‘ शिक्षण घेत असताना अभ्यास वाचन करताना सहजयोग ध्यानधारणे द्वारे
एकाग्रता आणून यश मिळवून उन्नती करा. प्रत्येकावर काही ना काही जबाबदारी आहे, ती पेलताना मन स्थिर संतुलित ठेवण्यासाठी आचार,विचार,समन्वय,शांतता अबाधित ठेवण्यासाठी ध्यानधारणेद्वारे सहज साध्य करून प्रगती करा, तसेच याद्वारे व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य विकसित करता येते, ” असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास माळवे यांनी केले तर आभार बी.जी. आव्हाड यांनी मानले. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)