‘शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ आवश्यक आहे’– अँड.नितीन ठाकरे
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि ६ ऑक्टोबर २०२३
β⇒ त्र्यंबकेश्वर , ता.५ (प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे ) :- प्रत्येक विद्यार्थ्याने मैदानाचा उपयोग केला पाहिजे व शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ अत्यावश्यक असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा स्पर्धा घेणे आवश्यक आहे”असे प्रतिपादन अँड. नितीन ठाकरे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बास्केटबॉल क्रिडांगण उदघाट्न समारंभ व आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा (मुली) स्पर्धेचे उदघाट्न कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथे माविप्र संस्थेचे सरचिटणीस व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अँड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी बोलत होते .
त्यावेळी त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख यांनी”महाविद्यालय फक्त पुस्तकी ज्ञानदानाचे काम करत नाही, तर ते विद्यार्थ्यांना नवी दिशा दाखवत असते . विद्यार्थ्यांना खेळामधून अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतात, त्यामुळे संस्था यासाठी सदैव प्रयत्नशील असते, “असे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी बास्केटबॉल या खेळाचा इतिहास सांगून महाविद्यालयाच्या कामांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते इंग्रजी विभागामार्फत भित्तीपत्रक स्पर्धेचे उद्घाटन व महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. मविप्र समाजाचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पिंगळे, सेवक संचालक .सी. डी.शिंदे, माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन वृक्षारोपण केले.
महाविद्यालयाचे गुणवंत प्राध्यापक डॉ.भागवत महाले व डॉ.जया शिंदे महाविद्यालयाचे सेवक कैलास गायवाड शरद लोखंडे ,भगवान करवर , दीपक मेढे , शाळेच्या सेविका श्रीमती लीला चव्हाण, श्रीमती मंजुळा फसाळे यांचा स्वच्छता दूत म्हणून अँड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माविप्र समाजाच्या निफाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अण्णासाहेब शिंदे , नाशिक जिल्हा क्रीडा समिती प्रमुख मा.दीपक कांडेकर, डॉ.दीपक जुंद्रे ,उपप्राचार्य डॉ. शरद कांबळे, सत्रप्रमुख डॉ.राजेश झनकर, कनिष्ठ महाविद्यालय सत्रप्रमुख श्रीमती.विद्या जाधव हे उपस्थित होते.यावेळी स्पर्धेत विविध महाविद्यालयातील १७ संघ व १४९ विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील क्रीडा संचालक, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिनेश उकिर्डे व आभार प्रदर्शन श्रीमती निता पुणतांबेकर यांनी केले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०