बिटको महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान संपन्न
β⇔ दिव्य भर बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :रविवार :दि .3 डिसेंबर 2023
β⇔नाशिकरोड, ता. 2 (प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ‘ नवीन मतदार नोंदणी अभियान ‘ संपन्न झाले. आज दिनांक २ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये विद्यार्थ्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी अभियान संपन्न झाले . यावेळी वर्षीप फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक श्री. अविनाश शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना नवीन मतदार नोंदणी, जाणीव व जागृती बाबत सखोल मर्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मतदार नाव नोंदणीचे महत्त्व विशद केले .या अभियानांतर्गत आज महाविद्यालयातील एकूण २० विद्यार्थ्यांचे नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी २५०० विद्यार्थ्यांनी यावेळी ऑनलाइन मतदार नाव नोंदणी केली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नोडल ऑफिसर डॉ. सुधाकर बोरसे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. विजय सुकटे यांनी केले.
β⇔ दिव्य भर बी एस एम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले :मो . ८२०८१८०५१०
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा