





सायखेडा विद्यालयात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न !
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि १२ सप्टेंबर २०२३
β⇒ सायखेडा ता. १२ ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ) :- जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ निकम यांच्या संकल्पनेतून व चित्रकला शिक्षक अरुण सावंत व विलास महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करून पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला. आपणास पाहिजे तसे आकार निर्माण करून कला निर्मितीचा आनंद घेतला. स्वरचित गणेश मूर्ती तयार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. प्लॅस्टर ऑफ पॅरिस , रासायनिक रंग वापरून गणेश मूर्ती तयार करतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देणे पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणे वसुंधरा वाचवायची असेल तर असे पर्यावरण पूरक कार्यक्रम आयोजित करणे काळाची गरज आहे. विद्यालयाचे प्राचार्य श्री नवनाथ निकम यांनी सांगितले यावेळी पर्यवेक्षक दौलत शिंदे एनसीसी प्रमुख सोमनाथ शिंदे विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन हरित सेना व चित्रकला विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
