एस.एन.पी.टी.इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीने जागतिक औषधदाता दिनानिमित्त भव्य रॅली संपन्न
β : पंचवटी(नाशिक):⇔एस.एन.पी.टी.इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीने जागतिक औषधदाता दिनानिमित्त भव्य रॅली संपन्न-(प्रतिनिधी : अनिता शिंदे)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 25 सप्टेंबर 2024
β⇔पंचवटी(नाशिक),दि,25(प्रतिनिधी : अनिता शिंदे ):- २५ सप्टेंबर रोजी एस.एन.पी.टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी कॉलेजतर्फे जागतिक औषधदाता दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात गोळे कॉलनी करण्यात आली. या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी “औषधदाता : जीवन रक्षक” या विषयावर बॅनर्स आणि फलक प्रदर्शित केले. यावेळी औषधदात्यांचे महत्त्व, आरोग्य क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि समाजातील त्यांची भूमिका ठळकपणे मांडली गेली.
सदर रॅली दरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधत, औषधदात्यांच्या कार्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. या उपक्रमामुळे समाजात औषधदात्यांच्या योगदानाची जाणीव अधिक जागरूक झाली आणि त्यांच्या कार्याबद्दलचा आदर वाढला. रॅलीचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला, ज्यामध्ये सर्व सहभागी सदस्यांनी औषधदात्यांच्या महत्त्वाविषयी एक नवा दृष्टिकोन प्राप्त केला. एस.एन.पी.टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीचे अध्यक्ष-नरेंद्रभाई ठक्कर, सचिव-देवेंद्रभाई पटेल, फार्मसी विभागाचे सचिव-उपेंद्रभाई दिनानी, राजेशभाई टक्कर, प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी मोलाचे योगदान दिले आणि शुभेच्छा दिल्या. या रॅलीच्या माध्यमातून औषधदाता केवळ औषध पुरवणारे नसून, ते समाजाच्या आरोग्याचे आधारस्तंभ आहेत, हा महत्त्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)