





सुरगाणा तालुक्यात पिंपळगाव येथील तरुण शेतकऱ्यांना सावध करून देखील पुरात घातली कार ! आणि बघा थरार ……….

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 5 ऑगस्ट 2024
β⇔सुरगाणा(नाशिक), दि.5 (प्रतिनिधी : रतन चौधरी ):- “असे म्हटले जाते की, अंगी ध्येय वेडे साहस असावे, मात्र वेडे ध्येय साहस नसावे. असाच अंगावर शहारे आणणारा जीव घेणा प्रसंग घडला आहे. ‘जीवावर आले ते बोटावर निभावले’..“देव तारी त्याला कोण मारी”.. असे आपण नेहमीच वाचतो, अन त्यातून धडे घेत शिकत असतो. अशीच एक दुर्घटना सुरगाणा तालुक्यातील मांधा येथील चिकारपाडा या ठिकाणी घडली आहे.

सुरगाणा तालुक्यात दोन महिना दडी मारू बसलेला पाऊस शनिवार आणि ४ ऑगस्ट रविवारी धुव्वांधार पाऊस सुरु झाला होता. दोन दिवसात १२२ मिलीमीटर पाऊस विक्रमी झाला.या पावसाने सुरगाण्यात गुही जवळील मांधा फाटा ते मांधा या रस्त्यावरून निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथून चार ते पाच तरुण द्राक्ष बागेवर काम करण्यासाठी मजूरांना घेण्यासाठी मांधा येथे आले होते. रस्त्यावर जात असतांना इर्टिगा व्हॅन चिकारपाडा, पवारपाडा जवळील फरशीच्या मोरीवरुन टाकली असता कार थेट पाण्यात वाहून जात होती. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणांनी आरडाओरड करीत कार पाण्यातून घेण्यास मज्जाव केला. मात्र चालकाने याकडे दुर्लक्ष करीत शहाणपणाचा आव आणत कार थेट पाण्यात टाकली. फरशी वरुन जोरदार पुराचा प्रवाह वाहत होता. कारचे टायर कसे बसे स्टोन गार्डला अडकून राहिल्याने ते गाडीच्या काचा उघडून सुखरूप बाहेर पडले. अगदी शंभर मीटर अंतरावरून मान नदीचा मोठा प्रवाह होता. कार बंद झाल्याने मांधा येथील तरुण राजेश लहरे यांनी ट्रक्टरच्या साहाय्याने कार पाण्यातून बाहेर काढून दिली. बंद पडल्याने पिक अप ला टोचन करून कार जागेवरून ओढत नेत पळ काढला. तरुणांनी नाव गाव विचारले असता काही न सांगता ते निघून गेले. यावेळी तरुण भास्कर गायकवाड, भरत पवार, चेतन जाधव, रतन जाधव यांनी अनोळखी व्यक्तींना मदत केल्याने माणुसकीचे दर्शन घडले. अनोळखी परिसर, रस्त्यावरून प्रवास करतांना ओळखीच्या माणसांची मदत घेणे केव्हाही उचित ठरते.या चित्रपटात शोभणा-या चित्त थरारक घटनेवरून देव तारी त्याला कोण मारी याचीच प्रचिती येते. फोटो- / व्हिडिओ सुरगाणा तालुक्यातील मांधा या गावी पाण्यात बुडालेली कार.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )