Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : मुंबई :⇔एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनधरणी करण्यात यशस्वी, बस पुर्ववत सुरु-(प्रतिनिधी : भागवत महाले)

β : मुंबई :⇔एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनधरणी करण्यात यशस्वी, बस पुर्ववत सुरु-(प्रतिनिधी : भागवत महाले)

018491

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनधरणी करण्यात यशस्वी, बस पुर्ववत  सुरु 

 Increase intensity ST bus strike

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  गुरुवार : दि, 5 सप्टेंबर   2024

β⇔ मुंबई, दि.5 (प्रतिनिधी : भागवत महाले ):- एसटी कर्मचारी कृती समिती संघटनेने बेमुदत संपाचे हाक दिली होती, आज संपाचा दुसरा दिवस असून राज्यात प्रवाशांची मोठी गैसोय झाल्याचं पाहायला मिळाले. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचे हाक दिली होती.

                  दरम्यान  एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. संपाच्या या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  एसटी कर्मचाऱ्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली, या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजारांची वाढ केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे शिस्त मंडळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते,  एसटी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील आदि मान्यवर देखील उपस्थित होते.                                                                                                                                     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का याकडे राज्याचे लक्ष लागून होते. अखेर एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपयाची वेतन वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र  सरकारने तब्बल सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एस टी  कार्मचार्याचे समाधान झाल्याने संप मागे घेतला आहे. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया  देताना भाजपनेते गोपीचंद पडळकर म्हणाले,की सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट सहा हजार पाचशे रुपयाची पगार वाढ केली आहे. ज्यांच्या पगारामध्ये 2021 मध्ये  5000 रुपयाची वाढ झाली होती. त्यांच्या मूळ पगारांमध्ये दीड हजार रुपयाची वाढ झालेली आहे.  ज्यांना चार हजाराची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजाराची वाढ झाली आहे. ज्यांना 2021 मध्ये अडीच हजाराची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात 4000 ची वाढ झाली आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारचे आभार व्यक्त करतो आहे. सर्व संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  स्वागत केला आहे. महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही जो उत्स्फूर्त संप पुकारला त्या संपाला सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी उद्यापासून कामावर रुजू होवून  प्रवाश्यांची गैरसोय कमी करावी असे आवाहन त्यांनी केले.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!