β:त्र्यंबकेश्वर :⇔’त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “सामाजिकशास्त्र मंडळ”उघाटन संपन्न’!(प्रतिनिधी :डॉ.प्रशांत रणसुरे)
'त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात "सामाजिकशास्त्र मंडळ"उघाटन संपन्न'!(प्रतिनिधी :डॉ.प्रशांत रणसुरे)
‘त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात”सामाजिकशास्त्र मंडळ”उघाटन संपन्न’!
β :त्र्यंबकेश्वर:⇔’त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “सामाजिकशास्त्र मंडळ”उघाटन संपन्न’!
प्रसंगी बोलतांना प्रमुख पाहुणे व वक्ते इतिहास विभागप्रमुख
प्रा.डॉ.श्रीहरी थोरवत (अभोणा),प्राचार्य डॉ.दिलीप पवार,
प्रा.डॉ.भागवत महाले, प्रा.डॉ.प्रशांत रणसुरे,
प्रा.संदीप गोसावी,(प्रतिनिधी :डॉ.प्रशांत रणसुरे)
”निसर्ग’ व ‘मानव’ संबंधांत ‘माणूस’ हा भौतिकवादी विकासासाठी पूर्णतः जबाबदार आहे”– प्रा.डॉ.श्रीहरी थोरवत
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 18 सप्टेंबर 2024
β⇔त्र्यंबकेश्वर(नाशिक),दि.18(प्रतिनिधी :डॉ.प्रशांत रणसुरे):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे “सामाजिकशास्त्र मंडळ” अंतर्गत सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व वक्ते इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ.श्रीहरी थोरवत (अभोणा), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप पवार, आय.क़्यु.ए.सी.समन्वयक प्रा.डॉ.शरद कांबळे, सामाजिकशास्त्र मंडळ अध्यक्ष प्रा.डॉ.भागवत महाले, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ.प्रशांत रणसुरे, समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संदीप गोसावी,प्रा.समाधन गांगुर्डे, प्रा. विष्णू दिघे आदिसह प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीचे प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रमुख पाहुणे व उद्घाटक इतिहास विभागप्रमुख अभोणा महाविद्यालय प्रा.डॉ.श्रीहरी थोरवत म्हणाले की ”निसर्ग’ आणि ‘मानव’ यांच्यामध्ये परस्पर संबंधांमध्ये माणसाने (प्रकृती) निसर्गावर विजय मिळवण्याचा अट्टाहास धरला आहे, त्या दृष्टीने ‘माणूस’ हा नेहमी निसर्गावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्यालाच आपण सांस्कृतिक विकास असे म्हणतो. पण असं दिसून येते, की माणसाने जास्त करून पदार्थवादी जीवनावरती जास्त भर देऊन मूल्यवादी जीवनावर कमी भर दिलेला आहे. भौतिकवादी हे जग आहे, त्याला धरूनच माणूस हा भौतिकवादी विकासासाठी पूर्णतः जबाबदार आहे. एकीकडे असं दिसून येतं, की जेवढे भौतिकवादी बदल झाले ते सर्व बदल माणसाला कुठेतरी आज देखील परिपूर्ण वाटत नाही, माणूस आज देखील समाधानकारक वाटत नाही. हा जो संघर्ष आहे, माणूस आणि प्रकृती या मधला संबंध म्हणजेच आपल्या संस्कृतीचा विकास असं वाटतं, आता नवीन जे शैक्षणिक धोरण आहे. ज्यामध्ये काही विषय असे आहेत, जे समाजशास्त्रामध्ये आता घेण्यात आले असून त्यामध्ये ‘ओपन इलेक्ट्रिक’ आणि ‘इंडियन नॉलेज सिस्टम इंडियन नॉलेज सिस्टम’ विषयाबद्दल सांगायचं तर त्यामध्ये भारतीय पुरातन काळी जी काही तत्त्वज्ञान पद्धती होत्या ज्यामध्ये वेद व उपनिषद आहे. यांचा समावेश आहे, त्याला महत्व प्राप्त झाले आहे. आपल्याला आधुनिकतेकडे बघायचं असेल तर ऑगस्ट कॉम या समाजशास्त्राचे जनक व कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर यांनी समाजशास्त्राची पहिली मांडणी शास्त्रीय दृष्टिकोनातून करून दिली आहे. त्याबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन, द्वंद्वात्मक सिद्धांतातून आधुनिक सामाजिक रचना व वास्तववादाची ओळख करून दिली आहे, त्यामुळे सामाजिक शास्त्र हे महत्वाचे कार्य करत असते, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना म्हणाले, की सोशल सायन्सस पुढे असलेली आव्हाने आजच्या तरुणाकडे दिसून येत आहेत. पण या सामाजिक शास्त्रांचा अभ्यास केल्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच काही नवनवीन संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा, मानव संसाधने, संशोधन,आंतरराष्ट्रीय पातळीवर विकास, राजकीय घडामोडींबद्दल प्रचंड प्रमाणामध्ये लिखाण होत आहे. या क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध आहेत. असे प्रतिपादन यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणा त महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिलीप पवार म्हणाले की, ‘साहित्य’ आणि ‘सामाजिकशास्त्र’ यांचा परस्पर संबंध असून ‘साहित्य’ हे सामाजिकशास्त्राचे ‘प्रतिबिंब’ आहे. असंही त्यांनी या वेळेला नमूद केलं. सामाजिकशास्त्रांमध्ये समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र असेल या सगळ्यांचं विश्लेषण आपल्याला साहित्यमधून साहित्याच्या अभ्यासातून आपल्याला दिसून येतात, असे सांगितले. अगदी पूर्व पाषाण ते आधुनिक युगापर्यंत जे काही मानवी माणसाचा जो प्रवास झाला आहे, तो सर्व प्रवास आपल्याला साहित्यामध्ये त्याचे प्रतिबिंब दिसून येत असते. साहित्याचा अभ्यास करताना असेही दिसून येतं, की सामाजिक नीतिमूल्यांचा अभ्यास आपण करतो आणि समाजामध्ये होणारे जे बदल आहेत ते आपण सहज समजू शकतो. त्यानंतर आंतरशाखीय सामाजिक शास्त्रांचा अभ्यास कसा असावा यावर देखील मार्गदर्शन केले. त्याचबरोबर लोककला आणि लोक साहित्य यांच्या माध्यमातून इतिहासाचा अभ्यास कसा करता येईल यावर देखील सरांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचबरोबर माध्यमांच्या मार्फत लोककला, गीते व नाटक याव्दारे देखील समाजामध्ये जे स्थित्यंतरे घडतात. त्याबद्दल अगदी सुरेख मांडणी लेखक, कवी सामाजिकशास्त्रांनी यांनी केली आहे. त्या अभ्यासामुळे देशाच्या विकासात खऱ्या अर्थाने सामाजिकशास्त्र अभ्यासकाचे मोठे योगदान आहे, असंही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सामाजिकशास्त्र मंडळ अध्यक्ष व राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भागवत महाले म्हणाले, की ”सामाजिकशास्त्रांमध्ये समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, भूगोल याविषयांचे महत्व अन्यय साधारण आहे.या सामाजिकशास्त्रांशिवाय मानवाचा विकास व देशाचा विकास होवू शकत नाही, ते सामाजिक मुल्यातून ‘मानवता’ व ‘सहजीवन’ शिकवत असते.”राजकीय सुरक्षितेशिवाय मानवी जीवन सुरक्षित राहू शकत नाही. अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी सामाजिक शास्त्र अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते. हे विसरून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्याचा परिचय इतिहास विभागप्रमुख डॉ. प्रशांत रणसुरे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. संदीप गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जयश्री माळवे, कु.धनश्री माळवे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थींनी व प्राध्यापक उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)