0
1
2
9
1
1
संदीप फाउंडेशन फार्मसीचा गणेश माळी ची उत्कृष्ट कामगिरी
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक :रविवार : दि 22 ऑक्टोबर 2023
β⇔महिरावणी (नाशिक), ता . २१ ( प्रतिनिधी : कमलेश दंडगव्हाळ ) :- येथील संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी कु गणेश माळी याने ओझर येथील माउली प्रतिष्ठान आयोजित नृत्य स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावले. गुरुवार दि १९ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत नाशिक व ओझर येथील स्पर्धकांचा मोठा सहभाग होता. कु गणेश हा नेहंनीच विविध नृत्य स्पर्धेत भाग घेत असतो. त्याच्या ह्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बोरसे व इतर शिक्षक वर्ग , कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०