





सुरगाणा तालुक्यात 39 टक्के पाऊस, उशिर झाल्याने भात लागवड कमी
दिव्य भारत बी एस एम न्यूज : बोरगाव -प्रतिनिधी : लक्ष्मन बागुल
बोरगाव (ता .सुरगाणा), ता १७ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :– पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या सुरगाणा तालुक्यात मागील वर्षी 13 जुलैपर्यंत 19.4 टक्के पावसाची नोंद झाली होती. मात्र, यावर्षी उशिरा का होईना चांगला पाऊस झाला असून 39 टक्के पावसाची नोंद झाली आहे. एकूण 280 मिमी पाऊस पडला आहे. उशिरा पाऊस पडल्याने लागवड फक्त 1.89 टक्के झाली आहे. लवकरच लागवड जोर धरेल अशी चिन्हे आहेत. मागील वर्षी 22.20 टक्के इतकी लागवड झाली होती. गेल्या 10 ते 12 दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. ज्यांच्याकडे विहिरीच्या पाण्याची सोय होती त्यांनी भात बियाणांची पेरणी अगोदरच केली होती अशाच भाताची तुरळक शेतक-यांनी लागवड सुरु केली आहे. तालुक्यात पूर्वी भात शेतीची तयारी हेल्यांच्या सहाय्याने केली जात असे. आता जवळपास 70 टक्के शेतकरी चिखल तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करत आहे. यामुळे शेतक-यांचे कष्ट व वेळेचीही बचत होत आहे.
13 जुलै 2023-24 तालुक्यात पीकनिहाय लागवड (क्षेत्र हेक्टर)
1) भात – एकूण क्षेत्र – 15883.17 – प्रत्यक्ष लागवड – 300.60- सरासरी – 1.89 टक्के.
2) नागली – एकूण क्षेत्र – 6536- प्रत्यक्ष लागवड – 0 – सरासरी – 0
3) वरई – एकूण क्षेत्र 3124.68 – प्रत्यक्ष लागवड 0 – सरासरी – 0
4) उडीद – एकूण क्षेत्र 1377.11 – प्रत्यक्ष लागवड 45.45 – सरासरी 3.30
5) तूर – एकूण क्षेत्र 770.17- प्रत्यक्ष लागवड 74.75 – सरासरी 9.71
6) कुळीद – एकूण क्षेत्र 508.26 – प्रत्यक्ष लागवड 4.40- सरासरी 0.87
7) भुईमूग – एकूण क्षेत्र 1103.98- प्रत्यक्ष लागवड 150.30 – सरासरी 13.61
–
“लागवड सरासरी इतकी होणार हवामान खात्याच्या अंदाजानुसार तालुक्यात पुढील काही दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच भात व इतर पिकांची लागवड सरासरी गाठू शकेल”. -प्रशांत रहाणे, तालुका कृषी अधिकारी सुरगाणा
