येडशीतराजेंद्र जाधव यांचे ‘रमजान उपवास‘ निमित्त “इफ्तार पार्टी“
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.29 मार्च 2024
β⇔येडशी– दि.29(प्रतिनिधी : सुभान शेख)-रमजान उपवास महिना पवित्र मानला जाणारा या रमजान उपवास महिन्यात कोणी तरी इफ्तार पार्टी चे नियोजन करतात. तर , कोणी उपवासांना जेवणाचे नियोजन करतात. या पवित्र रमजान महिन्या मध्ये अनेकजण पुण्य मिळवितात. या पवित्र रमजान महिन्यामध्ये ज्या व्यक्तीनी इफ्तार पार्टी किंवा जेवण देणारे व्याक्तिसाठी सर्व मुस्लिम समाज बांधव ईश्वर अल्लाह कडे दुवा केली जाते.
उस्मानाबाद – धाराशिव तालुक्यातील येडशी येथे जामा मस्जिदचे अध्यक्ष – जब्बार पटेल यांच्या उपस्थित राजेंद्र पांडुरंग जाधव यांच्या वतीने मंडप उभा करून मंडपाची सजावट करून आज दि.२९ मार्च २०२४ शुक्रवार रोजी इफ्तारच्या वेळेस मुस्लिम समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजित करण्यात आले. या इफ्तार पार्टीत टरबूज , केळी , खरबूज , पेंड खजुर ,आदि सर्व फ्रुटचे नियोजन करण्यात आले. या इफ्तार पार्टीत इफ्तार च्या वेळेस जामा मस्जिदचे मौल्लवी – अमजद पटेल यांनी इफ्तार ची दुवा करून , उपवास सोडण्यात आले.
या वेळी उपस्थित असलेले – जामा मस्जिदचे अध्यक्ष – जब्बार यासिन पटेल , उप अध्यक्ष – अशफाक पटेल , सदस्य – सल्लाऊदिन शेख , महामुद पटेल , आखिल नजिर शेख , तसेच गावातील सुभान शेख , सुभान पटेल , सर्फराज पटेल , उस्मान पटेल , निसार पटेल , इसामुद्दीन पटेल , दस्तगीर शेख , आदि सर्व मुस्लिम समाज बांधव इफ्तार सोडण्यासाठी जामा मस्जिद समोर उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510