





प्रा.डॉ.भागवत शंकर महाले, अपक्ष उमेदवार, ‘कळवण-सुरगाणा’ विधानसभा मतदारसंघ प्रचाराला प्रारंभ

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि. 3 नोव्हेंबर, 2024
β⇔सुरगाणा (नाशिक), ता.3 (प्रतिनिधी : शाश्वत महाले ):- ‘कळवण – सुरगाणा’ विधानसभा मतदारसंघातील सुरगाणा येथील श्री स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्र मध्ये उमेदवार म्हणून उभे असलेले उमेदवार प्रा. डॉ. भागवत शंकर महाले यांनी काल श्री स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्र येथून श्रीफळ वाढवून प्रचाराला समारंभ कऱण्यात आला.
त्यावेळी प्रा. डॉ. भागवत शंकर महाले यांनी सांगितलं की, गोरगरिबांचे न्याय,हक्क,अद्याप न मिळाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती,रस्त्याची दुरवस्था, वाहतूक प्रश्न,रोजगाराचा प्रश्न 75% लोकांचा स्थलांतर प्रश्न,बेरोजगार तरुण व्यसनाधीन,कुटुंबं उद्ववस्थ,उच्च शिक्षित तरूण नोकरी प्रश्न,शेत मालाला योग्य भाव नाहीं, पावसाचे पाणी अनिश्चितता, आरोग्यं प्रश्न डोलीत घेवुन औषधोपाचार करण्याची वेळ,महिलांवर होणारे अत्याचार,मुली असुरक्षित आहेत.कांदा,लसूण,भात,वरई (वरी), भाजीपाला,पिकाला योग्य भाव अद्याप ठोस नियोजन नाहीं.हे प्रश्न खरचं सुटलेले आहेत का ? हा प्रश्न स्वतः मनाला विचारा मग विकास 77 वर्षांत कोणाच्या घरात गेला हे ओळखा? कोट्याधीश लोक जनतेचे हे प्रश्न कसे सोडविणार आहेत.सर्व जनतेचा पैसा त्यांच्या घरात गेला आहे,हे ओळखा.लोकप्रतिनिधींनी पैसा कमविण्यात आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं,त्या नेत्याला पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला आहे का?हा नेता फक्त एक प्रतिनिधी नसून आपल्या संघर्षांचा,न्यायाचा आधार असतो.
आपल्याला सुरक्षितता आणि न्यायाची खात्री वाटते का? त्यामुळे आता नवीन उमेदवार प्रा.डॉ.भागवत शंकर महाले मला विजयी संकल्पासाठी आपण एकजूट होऊन माझ्या पाठीशी उभं राहून निवडून द्या. असे आवाहन प्रा डॉ भागवत महाले यांनी या प्रसंगी केले. अद्याप सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवू शकले नाहीत त्यामुळे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण मला साथ द्या असे त्यांनी सांगितले. शेतीला पूरक पाणी नाहीं, रस्ते डांबरीकरण केलेले नाही, चार महिन्यांनंतर लोकांना सधन भागात रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे कुटूंब पुर्णपने विस्थापित होतें. शिक्षण, आरोग्यं, सामाजिक उपक्रम यापासून दूर राहावे लागते. म्हणून जनतेचे साथ राहीले तर हे प्रश्न एकावर्षात निकाली काढले जातील म्हणून सर क्षेत्राचा अभ्यास असलेला नेता विधान सभेत लोकांनी पाठवणे आवश्यकच आहे. प्रसंगी उमेदवार प्रा डॉ भागवत महाले, सचिन महाले, प्रवीण आहेर, दीपक महाले, विजय महाले, सखाराम पवार, रतन चौधरी, बापू देशमुख, वैशाली महाले, लीना महाले, वैशाली महाले, शाश्वत महाले, लीलाबाई महाले , रमेश देशमुख, भास्कर महाले आदी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510