





शिक्षक परिषद दिंडोरी गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांच्यात प्रलंबित प्रश्नांवर बैठक

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि.09 एप्रिल 2024
β⇔दिंडोरी ( नाशिक)दि.09 ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिष्टमंडळाने पंचायती समिती शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी व सहाय्यक लेखा अधिकारी श्री. बहिरम यांच्या समवेत बैठक केली. या बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये १. निवड श्रेणी नवीन प्रस्ताव पडताळणी,२. निवड श्रेणी मंजूर शिक्षकांची वेतन निश्चिती, ३.इन्कम टॅक्स १६नंबर फॉर्म संदर्भात, ४. प्रलंबित फरक बिले व मेडिकल बिलांबाबत, ५.उर्वरित केंद्रांचा सेवा पुस्तक कॅम्प लावणे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष रावसाहेब जाधव, कार्यवाह रविंद्र ह्याळीज,जिल्हा सल्लागार मनोजकुमार सोनवणे, कार्याध्यक्ष सुभाष बर्डे, कार्यकारी अध्यक्ष ए. टी. पवार,नितीन शिंदे यांच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी व सहाय्यक लेखाधिकारी यांची भेट घेऊन निवडश्रेणी मंजुर लाभार्थी शिक्षकांना एप्रिलच्या पगारात निवडश्रेणी लागु करणे आणि नवीन निवडश्रेणी प्रस्ताव मंजुर करण्यासाठी कॅम्प लावणे या दोन प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी चंद्रकांत गवळी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन 20 एप्रिल 2024पर्यंत नवीन प्रस्ताव स्विकारणे नंतर त्वरित प्रस्ताव अचुक पडताळणीसाठी कॅम्प लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विस्तार अधिकारी वंदना चव्हाण , कार्यालयीन अधिक्षक दळवी भाऊसाहेब व म. का. आहेर,निलेश भारती उपस्थित होते.यावेळी उर्वरित प्रलंबित मेडिकल बिले,फरक बिले , पेन्शनर शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे फरक बिले व इतर बिले जमा करण्याची मागणी करण्यात आली. उर्वरित केंद्राचे सेवा पुस्तक कॅम्प घेण्यात येणार आहे.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510