बिटको महाविद्यालयात गोखले सोशल क्लबचे उद् घाटन
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि ७ ऑक्टोबर २०२३
β⇒ नवीन नाशिक , ता ६ ( प्रतिनिधी : डॉ. कृष्णा शहाणे ) नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान हे अतुलनीय असून ते एक मुत्सद्दी राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते, अर्थतज्ञ आणि थोर विचारवंत म्हणून प्रसिद्ध होते. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे अर्थशास्त्रात अमूल्य योगदान आहे, असे प्रतिपादन लेखक, कवी आणि साहित्यिक नंदन राहणे यांनी केले. आर. एन. सी. आर्ट्स जे.डी.बी. कॉमर्स अँड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय नाशिक रोड, येथील गोखले सोशल क्लबच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा अनिल कुमार पठारे, उपप्राचार्य डॉ.आकाश ठाकूर व समन्वयक डॉ. कल्याण टकले, गोखले सोशल क्लबचे प्रमुख डॉ. कृष्णा शहाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी या होत्या, त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे अत्यंत बुद्धिमान आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते असे सांगून नामदार गोखले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर विशद केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोखले सोशल क्लब आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कृष्णा शहाणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख वक्ते नंदन राहणे यांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, समन्वयक डॉ. कल्याण टकले यांचा सत्कार अनुक्रमे गोखले क्लबचे प्रमुख डॉ. कृष्णा शहाणे, डॉ. अनिल सावळे, डॉ. सुभाष भोसले यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचा सत्कार प्रमुख वक्ते नंदन राहणे यांनी केला.
याप्रसंगी डॉ. सुरेश कानडे, डॉ. विजय सुकटे, प्रा.डॉ. बी.बी. गाडेकर, प्रा. डॉ. सुभाष भोसले, प्रा.डॉ. अनिल सावळे, प्रा. लक्ष्मण शेंडगे, प्रा. डॉ. सुनिता आहीरे, प्रा. डॉ. वैशाली जोशी, प्रा. डॉ. भास्कर आव्हाड, प्रा. अनुराग रत्नपारखी, प्रा. नेहा विश्वकर्मा आदींसह प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता . प्रा.डॉ. सुभाष भोसले यांनी प्रमुख अतिथी आणि अध्यक्षांचा परिचय करून दिला, प्रा. डॉ. सुनीता आहीरे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.डॉ. अनिल सावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०