





आडगाव वैद्यकीय महाविद्यालयतर्फे सोनगावला सर्वरोग निदान शिबिर संपन्न
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि. 23 सप्टेंबर 2023
β⇒ निफाड ( सायखेडा ) , ता. 23 ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ) :– डॉ .वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र आडगाव (नाशिक ) तर्फे सोनगाव (निफाड) सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च प्रतीची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हा या आरोग्य शिबिराचा प्रमुख उद्देश होता . यावेळी सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक समाजाचे निफाड तालुका संचालक शिवाजी आप्पा गडाख यांच्या हस्ते झाले.
यावेळी मेडिकल कॉलेज आडगाव येथून आलेल्या डॉ .पूजा सपकाळ डॉ. आकाश दुबे डॉं.मंदार शिंदे ,डॉ. समीर ताकलेकर ,डॉ.अमिषा जाधव ,डॉ. आलिशा गिलानी डॉ. समृद्धी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा दिली पुढील मेडिकल तपासण्यासाठी मेडिकल कॉलेज आडगाव येथे येण्याचे सूचना दिल्या यावेळी 250 रुग्णांची तपासणी करण्यात आली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड.नितीनभाऊ ठाकरे यांच्या प्रेरणेतून जिल्ह्यातील गावांमध्ये वरील उपक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येत आहे. त्यास उस्फूर्तपणे प्रतिसाद देखील मिळत आहे.
सर्व निदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन शालेय समिती अध्यक्ष विजय कारभारी कारे, तंटामुक्ती केंद्राचे अध्यक्ष संजय कांडेकर ,सोनगाव चे सरपंच बाळासाहेब गावले ,माजी सरपंच रतन कांडेकर, सोसायटीचे चेअरमन कचरू गावले, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावले, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब कांडेकर, संपतराव गावले, डॉ .हेमंत दळवी, डॉ. सुधीर दजगुडे, विजय शिवनाथ कारे, गोरक्षनाथ गाडे, अनिल दजगुडे ,नाना खिंडे ,धोंडीराम मुरादे, धोंडीराम कारे, पांडुरंग मुरादे, सुरेश लहानु खालकर ,उत्तम जाधव, तानाजी कारे (तात्या) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
