





कर्मवीर डॉ. प्रभाकर सोनवणे स्मृतीनिमित्त आंतरशालेय “कबड्डी चषक स्पर्धा” आयोजन

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि.11 जानवरी 2025
β⇔ताहाराबाद (नाशिक),ता.11 (प्रतिनिधी: शाश्वत महाले ):- बागलाण परिसरातील सर्व संस्थाचालक, शाळेतील विद्यार्थी, आणि शिक्षकांना कळविण्यात आनंद होतो की, यंदाही २०२५ साली कर्मवीर स्व. डॉ. प्रभाकर नाना दगाजी सोनवणे स्मृती आंतरशालेय कबड्डी चषक (१७ वर्षांखालील मुले) तसेच स्व. सौ. सुशीलाताई प्रभाकर सोनवणे स्मृतीनिमित्त आंतरशालेय कबड्डी चषक (१७ वर्षांखालील मुली) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दि. २० जानेवारी २०२५ पासून डॉ. सोनवणे यांच्या सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी, सिद्धी हिल्स एज्युकेशनल कॅम्पस, विंचूर-प्रकाशा हायवेलगत, करंजाड, ता. बागलाण, जि. नाशिक येथे होणार आहे. या चषक स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख ३०,०००/- रुपयांची विविध बक्षिसे, ट्रॉफी, आणि प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत.
बागलाण परिसरातील सर्व शाळांमधील १७ वर्षांखालील मुला व मुलींच्या संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे. तसेच, परिसरातील शाळा व संस्थांपर्यंत ही माहिती पोहोचवून अधिकाधिक संघांनी सहभाग नोंदवावा, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आयोजक :
डॉ. प्रसाद दादा सोनावणे
संस्थापक, सिद्धी ग्रुप ऑफ एज्युकेशन
संचालक, बागलाण तालुका, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक
संपर्कासाठी :
- अमोल खैरनार सर: ९०११११८१३
- गायत्री पाटील मॅडम: ९५४५६३५२२६
- सचिन चव्हाण सर: ९४२०००४२८३
- राशी बच्छाव मॅडम: ८७४१९०७१८०
स्पर्धा स्थळ:
सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी, करंजाड, ता. बागलाण, जि. नाशिक सर्व स्पर्धक संघांना शुभेच्छा!
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )