Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

β : नागपूर, :⇔ “पत्रकारिता” ही भारतीय लोकशाहीची ढाल – रमेश लांजेवार- ( प्रतिनिधी : रमेश लांजेवार )

β : नागपूर, :⇔ "पत्रकारिता" ही भारतीय लोकशाहीची ढाल - रमेश लांजेवार- ( प्रतिनिधी : रमेश लांजेवार )

0 0 2 5 6 3

पत्रकारिता ही भारतीय लोकशाहीची ढाल – रमेश लांजेवार

β : नागपूर, :⇔ "पत्रकारिता" ही भारतीय लोकशाहीची ढाल - रमेश लांजेवार- ( प्रतिनिधी : रमेश लांजेवार )
β : नागपूर, :⇔ “पत्रकारिता” ही भारतीय लोकशाहीची ढाल – रमेश लांजेवार- ( प्रतिनिधी : रमेश लांजेवार )

              6 जानेवारी दर्पणदिन व मराठी पत्रकार दिवस

β⇔  दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक : शनिवार : दि. 6 जानेवारी 2024 

 β⇔ नागपूर, ता 6 ( प्रतिनिधी : रमेश लांजेवार ) :- पत्रकारिता ही भारतीय लोकशाहीची ढाल.  पत्रकारिता ही कोहीनुरच्या हिऱ्यापेक्षाही मौल्यवान  आणि तलवारी पेक्षाही तीक्ष्ण धारधार मानल्या जाते आणि आहे. त्याचप्रमाणे पत्रकारिता ही जगाचा तिसऱ्या डोळ्याची भुमिका बजावीत असते.पत्रकारिता समाज घडविण्याचे व राष्ट्रहीत जपण्याचे मोठे साधन आहे. महाराष्ट्रात दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिवस साजरा केला जातो.हा दिवस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केल्या जाते.बाळशास्त्री जांभेकरांना मराठी भाषेतील पत्रकारिता सुरू केल्यामुळे “द फादर ऑफ मराठी जर्नलिज्म” या रूपाने सुध्दा ओळखले जाते.म्हणुनच महाराष्ट्र सरकारने पत्रकार दिवस 6 जानेवारी या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त घोषित केला आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्यात 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिवस म्हणुन साजरा केला जातो.जांभेकरांचे काही तत्व होते सत्तेच्या विरोधात लीखान करने.कारण हे लीखाण सत्तेच्या विरोधात नसुन सत्ताधाऱ्यांच्या चुकांमध्ये दुरूस्ती करणे होय.जोपर्यंत पत्रकार सत्तेच्या विरोधात लिहिणार नाही तोपर्यंत देशात काय सुधारणा करायची आहे हे कदापी लक्षात येणार नाही.त्यामुळे सरकारच्या चुका लेखणीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवुन सरकारचे डोळे उघडण्याचे काम पत्रकारांमार्फत व्हायला पाहिजे.म्हणनु जांभेकर म्हणतात सत्ताधाऱ्यांनी पत्रकारांचे कौतुक नव्हे,उलट शिव्या घातल्या तर खऱ्या पत्रकारितेची पावती मीळते असे ते मानीत. भारतातच नाही तर संपूर्ण जगात पत्रकारितेला मोठे महत्व आहे.त्यामुळे पत्रकारितेला “चौथास्तंभ” ही उपमा दिली आहे.

                      जागतिक हालचाली, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, राजकीय हालचाली, जिल्हास्तरीय, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संपूर्ण माहिती 140 कोटी जनतेपर्यंत पोहचवीण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते.प्रत्येक वर्षी 6 जानेवारीला महाराष्ट्रात पत्रकार दिवस साजरा केला जातो.1920 मध्ये लेखक वाल्टर लिपमैन आणि एक अमेरिकी दार्शनिक जॉन डेवी यांनी लोकतान्त्रिक समाजामध्ये पत्रकारितेच्या भुमिकेवर विचार विमर्श प्रकाशित केले होते. पत्रकारिता जनता आणि नितीनिर्माते यांच्यातील मध्यस्थीतीची भुमिका हाताळीत असते.तेव्हाच आपल्याला समतोलता दिसून येते.या समतोलतेचे दायीत्व पुर्णपणे पत्रकारितेवर अवलंबून असते व पत्रकार आपली जबाबदारी मोठ्या शिताफीने पारपाडतो.प्रत्येक बाब जनतेच्या हितासाठी असावी या उद्देशाने प्रत्येक गोष्ट जनतेच्या हितार्थ प्रकाशित केल्या जाते.पत्रकारितेचे अनेक तत्व आहेत लिखाण, समाजातील घडामोडींवर नजर ठेवून माहीती एकत्र करने, कॅमेरात कैद करने व ती पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचवीने.आजच्या आधुनिक युगात वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन,वेब-पत्रकारिता, मिडिया, फेसबुक, सोशल मीडिया,ई-पत्रकारिता यांच्या माध्यमातून पत्रकारितेची भुमिका मोठ्या प्रमाणात बजावली जाते.परंतु काही वाहीण्या स्वत:च्या स्वार्थासाठी कार्य करतात. यामुळे पत्रकारितेची बदनामी होतांना सुध्दा आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.परंतु पत्रकारिता तीच असते ज्यामुळे समाजाची जडणघडण मजबूत होते यालाच म्हणतात “चौथास्तंभ”.पत्रकारिता साधी शैली नसुन कोणत्याही घटनेचा लिखित रूपात वर्णन करण्याकरिता अनेक शैलींचा सटीकतेने उपयोग केल्या जातो यालाच म्हणतात “पत्रकारितेची शैली”. पत्रकारितेचे अनेक प्रकार आहेत एम्बुश पत्रकारिता, सेलिब्रिटी पत्रकारिता, कन्वर्जेस पत्रकारिता,गोंजो पत्रकारिता, खोजी पत्रकारिता, नवीन पत्रकारिता, विज्ञान पत्रकारिता, खेळ पत्रकारिता इत्यादी अनेक पत्रकारितेचे प्रकार आपल्याला पहायला मिळतात. पत्रकारांमध्ये नेहमी निष्पक्षता दिसून येते त्यामुळे समाजात खंबीरपणे उभे राहून आपल्या लेखणीच्या माध्यमातून तिक्ष्ण(धारधार) लीखाण केल्या जाते.यातुनच समाजाला दीशा-निर्देश समजुन येतात.पत्रकारितेच्या लेखणीत एवढी धार असते की तलवारीची धार त्यासामोर फीक्की पडतांना दिसून येते.कारण संपूर्ण समाजाच्या नैतिकतेची जबाबदारी पत्रकारांच्या खांद्यावर असते व ती लेखणीतून निर्माण होत असते.आज पत्रकारितेच्या माध्यमातून स्थल,जल,वायु, आकाश-पाताळ,ग्रह-तारे यातील घडामोडी जनतेला कळुन येतात.

             आज मिडियाच्या माध्यमातून व वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण पहात असतो.या घडामोडी समाजापर्यंत पोहचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते.ज्याप्रमाणे सुरंग खोदुन खनीज संपत्ती शोधल्या जाते.त्याचप्रमाणे पत्रकारिता व लेखक आपले विचार समाजापर्यंत पोहचविण्याकरिता संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करीत असतो.तेव्हाच देशातील प्रत्येक व्यक्ती सकाळी वर्तमानपत्राची आतुरतेने वाट पाहत असतो.वर्तमानपत्राला सकाळचा नाश्ता सुध्दा म्हणतात.यावरून स्पष्ट होते की पत्रकारिता व लेखक यांच्यामुळे समाजाची जडणघडण होण्यास मोठी मदत मीळत असते.आज पत्रकारिता कोहीनुरच्या हीऱ्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे.आज एका लेखणीतून लाखो-अरबो शब्द बाहेर पडतात म्हणजेच पत्रकारिता ही समुद्रापेक्षाही अफाट व नदीपेक्षा सोज्वळ निर्मळ असल्याचे दिसून येते. यातुनच जगात मोलाचा संदेश जात असतो.लेखणीमध्ये व पत्रकारितेमध्ये एवढे तालमेल आहे की संपूर्ण जग लेखणीच्या माध्यमातून पत्रकारितेवर मोठ्या प्रमाणात विश्र्वास ठेवतो.मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी “दर्पण” नावाचे पहिले मराठी दैनिक सुरू केले होते. बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी,तेलगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीस या भाषांचे ज्ञान होते.मराठी व संस्कृतमध्ये निष्णात झाल्याने बाळबोध,गीतपाठ, वेदपठण,अमरकोश,लघुकौमुदी व पंचमहाकाव्य या संस्कृत ग्रंथांचा दांडगा अभ्यास होता.1832 साली सुरू करण्यात आलेले बाळशास्त्री जांभेकरांचे “दर्पण” हे मराठीतील “पहिले वृत्तपत्र”होय.त्यावेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी “दर्पण”मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.यानंतर राजा राममोहन रॉय यांचा “संवाद कौमुदी”टिळक-आगरकरांचा ‘मराठा’ व ‘केसरी’ गणेश शंकर विद्यार्थी यांचा ‘प्रताप’ ही सर्व वृत्तपत्रे “आर्थीक तोटा” सहन करून समाज जागृत करण्यासाठी चालविल्या जात होती.

                  पत्रकारीतेतील तीक्ष्ण(धारधार) लेखणीमुळे भारत स्वतंत्र करण्यास मोठी भूमिका होती.त्यामुळे इंग्रजांना भारत सोडून जावे लागले व 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला.परंतु आता देशात काही राजकीय पक्षांची वृत्तपत्रेसुध्दा दिसून येतात हि वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या आणि दुरदर्शन वाहीण्या पत्रकारितेला कलंकित करण्याचे काम करीत असतात.याला केंद्र व राज्य सरकारने कोठेतरी रोखले पाहिजे.आपल्या पुर्वजांनी ज्याप्रमाणे पत्रकारितेची जोपासना केली त्याचप्रमाणे पत्रकारितेची जोपासना व्हायला पाहिजे आणि पत्रकारिता व चौथास्तंभ याला कोणताही आघात पोचनार नाही याची जबाबदारी राजकीय पुढाऱ्यांनी व सरकारने घेतली पाहिजे.टिआरपी वाढावी म्हणुन काही वाहीण्यांनी पत्रकारीतेची व चौथास्तंभ याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला होता.परंतु सरकारने टिआरपी घोटाळा उघडकीस आणुन पत्रकारिता व चौथास्तंभ यांच्यावर थोडीशीही ईजा येवु दिली नाही.6 जानेवारी पत्रकार दिवसांच्या निमित्ताने हेच सांगु इच्छितो की पत्रकारिता व चौथास्तंभ याला कुठल्याही प्रकारची क्षती होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेण्याची गरज आहे.देशात कुठल्याही परिस्थितीत पत्रकारितेचे व्यवसायीकरण होवु नये व राजकीय दृष्ट्या कोसो दूर राहुन पत्रकारिता आणखी बळकट केली पाहिजे.कारण पत्रकारिता ही प्रसारमाध्यमांचे काम करीत असते यातुनच समाजाला दीशा निर्देश मिळत असते व समाज निर्माण होतो. पत्रकारिता ही वटवृक्षासारखी अफाट आहे कारण समाजातील घटना उन, पाउस, थंडी,वादळ, सुनामी यासारख्या असतात यापासून संरक्षण करण्याचे काम पत्रकारिता नेहमी करीत असते. पत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता निर्भीडपणे कार्य करीत असतो.परंतु गेल्या काही वर्षांपासून असामाजिक तत्वांकडुन  पत्रकारांवर हल्ले होत असतांनाचे दिसून येते याचा मी जाहीर निषेध करतो.अशा असामाजिक तत्वांना केंद्र व राज्य सरकारांनी कोठेतरी रोखले पाहिजे व  कठोर कारवाई केली पाहिजे. 6 जानेवारी पत्रकारिता व दर्पण दिनाला शत-शत प्रणाम करतो आणि मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो.जय हिंद!

β : नागपूर :⇔ जगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज, 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस - ( प्रतिनिधी : रमेश  लांजेवार)
        लेखक :-     

                रमेश कृष्णराव लांजेवार                                                                                                                                                   (माजि विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)                                                                                                                                          मो.नं.9921690779, नागपूर.  

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!